ETV Bharat / city

'वाढदिवसाच्या दिवशीच मंत्रीपदाची शपथ' मातोश्रीचा विश्वास सार्थकी लावणार, अनिल परबांना विश्वास - maharashtra government Cabinet expansion

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला, तो विश्वास आपण सार्थकी लावू. पक्षाची केली तशीच महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू, असे अनिल परब यांनी म्हटले.

anil parab
अनिल परब
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:40 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज सोमवारी विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. यावेळी सरकारमध्ये शिवसेनेच्या 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांचा समावेश झाला. विधानपरिषदेतील सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश टाळणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या विश्वासू साथीदार अ‌ॅड. अनिल परब यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनिल परब यांनी दिलेली प्रतिक्रिया...

हेही वाचा... अजितदादांचा 'हा' विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

अनिल परब यांनी आज सोमवारी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतला आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला, त्याला पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. तसेच ज्या प्रमाणे आज पर्यंत पक्षाची सेवा केली, तशीच सेवा राज्याच्या जनतेची देखील करणार असल्याचे परब यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा... बाबांचे आशिर्वाद नेहमीच सोबत म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो - अमित देशमुख

उद्धव ठाकरे यांचे विश्वासु अ‌ॅड. अनिल परब...

अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखळे जातात. आमदार व विभागप्रमुख म्हणून अ‌ॅड. अनिल परब हे काम करत आहेत. शिवसेनेची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडणारे, संघटन कौशल्य आणि निवडणूकीचे यशस्वी तंत्र राबवण्यात ते माहिर असल्याचे मानले जाते. महाआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी त्यांनी शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली.

अनिल परब महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत होते, शिक्षण पूर्ण करत असतानाच शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या महाराष्ट्र श्रमिक कामगार सेनेत ट्रेड युनियनमध्ये ते कार्यरत होते. तिथेच त्यांनी कायदेशीर शिक्षण घेत LLB चे शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे अचूक ज्ञान असणारे व गृहनिर्माणच्या प्रश्नांवर डॉक्टरेट प्राप्त करणारे अनिल परब यांचा आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

हेही वाचा... ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकण, मुंबई अन् पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा

30 डिसेंबर 'अनिल परब यांचा जन्मदिवस'

आज सोमवार 30 डिसेंबर हा अनिल परब यांचा जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी त्यांना मंत्रीपदाची शपथ मिळाल्याने त्यांच्या आनंदात नक्कीच भर पडली आहे. आपल्याला हे वाढदिवसाचे सर्वाच मोठे गिफ्ट मिळाल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.