मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. मात्र, असले तरी शिवसेना आता पूर्वीसारखी राहिली नाही किंबहुना शिवसेनेची भाषा मवाळ झाले असे काहीसे चित्र राज्याच्या राजकारणात दिसते. ख्वाजा युनूस प्रकरणानंतर निलंबित असलेले एपीआय सचिन वाझे तब्बल 17 वर्षानंतर पोलीस दलात सहभागी झाले. वाझे आणि शिवसेना यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. त्यातच वाझे अवघ्या नऊ महिन्यात पोलीस दलातून निलंबित झाले आहेत. वाझे प्रकरणामुळे शिवसेना विरोधी पक्षाच्या कात्रीत सापडली आहे. याचे उदाहरण म्हणजे अधिवेशनादरम्यान विरोधकांनी केलेला गदारोळ. सचिन वाझे प्रकरणामुळे शिवसेना बॅकफूटवर आली आहे, असे जाणकारांचे मत आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांनी शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
हेही वाचा - महागाईचा भडिमार: एप्रिलपासून औषधांच्या किमतीत होणार वाढ
वाझे प्रकरणामुळे शिवसेना बॅकफूट वर!
अँटिलिया स्फोटक प्रकरण वाढत चालले आहे. यात शिवसेनेची अडचण स्पष्टपणे दिसून येत आहे. एपीआय सचिन वाझे यांचा कार स्फोटक प्रकरणाशी संबंध काय आहे, हे आता चौकशीत स्पष्ट होत आहे. प्रवीण पुरो सांगतात, सचिन वाझे आणि शिवसेना यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. युनूस खान प्रकरणात निलंबित वाझे यांना पोलीस दलात पुन्हा घ्या, यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. आता सत्ता आल्यानंतर शिवसेनेने सचिन वाझे यांना पोलीस दलात घेतले. आणि सचिन वाझे यांनी अँटालिया समोर जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ उभी करून ठेवली या प्रकरणामुळे शिवसेना चांगलीच बॅकफूटवर गेली आहे.
हेही वाचा - धक्कादायक! मादी श्वानावर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल
शिवसेना मवाळ झाली?
जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेची शिवसेना आणि आताची शिवसेना यात जमीनआस्मानाचा फरक आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संपादकीयची भाषा देखील बदलली आहे. पूर्वी संपादकीयची भाषा कठोर असायची. मात्र, आता ही भाषा मृदू झाली आहे. सरकारपुढे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता शिवसेनेची भाषा मृदू झाली आहे. बदललेल्या भाषेमुळे शिवसेनेची अडचण स्पष्टपणे दिसत आहे, असे पुरो म्हणाले.
हेही वाचा -'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'