ETV Bharat / city

Maharashtra Assembly Winter Session 2021 : अकोला महापालिका बरखास्त करा, शिवसेनेची लक्षवेधीतून मागणी

अकोला महापालिकेतील ( Akola Municipal Corporation ) भ्रष्टाचाराचा मुद्दा विधान परिषदेत ( Maharashtra Council Winter Session 2021) चांगलाच गाजला. शिवसेनेने महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी लक्षवेधीतून लावून धरली. तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विरोध दर्शवला. यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

विधानभवन
विधानभवन
author img

By

Published : Dec 28, 2021, 11:05 PM IST

मुंबई - अकोला महापालिकेतील ( Akola Municipal Corporation ) भ्रष्टाचाराचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला. शिवसेनेने महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी लक्षवेधीतून लावून धरली. तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विरोध दर्शवला. यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपसभापतींनी कायद्याचा दाखला देत, लक्षवेधी सभागृहात मांडण्यास संमती दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत कामकाजावर बहिष्कार टाकला.

महापालिका बरखास्त करा

अकोला महापालिकेत ( Akola Municipal Corporation ) मागील पाच वर्षांपासून गैरव्यवहार सुरू आहे. पालिकेत मांडलेल्या ठरावात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. नगरसेवकांना विश्वासात न घेता, अधिकाऱ्यांशी संगनमत करुन मोठ्या प्रमाणात आर्थिक ठराव मंजूर केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली. समितीने 7 ऑक्टोबर, 2021 ला तत्कालीन आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. सुमारे दोनशे कोटींचा घोटाळा झाला असताना संबंधितांवर अद्याप कारवाई केलेली नाही. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. शिवसेनेचे सदस्य गोपीकिशन बजोरीया ( Gopikishan Bajoria ) यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडून भ्रष्टाचार आणि गैरकारभारामुळे अकोला महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर हरकत घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, लक्षवेधी सूचना मांडता येणार नाही, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कायद्याचा संदर्भ देत, लक्षवेधी मांडण्यास संमती दर्शवली. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत, वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी करत गदारोळ घातला. उपसभापतींनी यामुळे दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.

विरोधकांचा सभात्याग

कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर गोपीकिशन बजोरीया यांनी संबंधित महापालिका बरखास्त करणार का, असा प्रश्न विचारला. विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. या गोंधळातच मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्षवेधीवर स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. विरोधक त्यामुळे अधिक संतप्त झाले. दरम्यान, तत्कालीन आयुक्तांनी घेतलेले 20 ठराव चुकीचे होते. संबंधितांवर कारवाई केली जाईल. परंतु, सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने लगेच कारवाई करता येणे शक्य नाही, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी यामुळे सभात्याग करत सत्ताधाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

हे ही वाचा - No Confidence Motion : विधान परिषदेचे उपसभापती गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव - प्रविण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.