ETV Bharat / city

विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर 'बेटी बचाव'चं बघा - शिवसेना

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये उसने दिलेले १० हजार रुपये परत मागितले म्हणून अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भापजव चांगलीच आगपाखड केली आहे.

author img

By

Published : Jun 10, 2019, 8:27 AM IST

विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर 'बेटी बचाव'चं बघा - शिवसेना

मुंबई - विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर, अलिगडमध्ये घडलेल्या भयंकर प्रकाराकडे पाहायला हवे, असे म्हणत शिवसेनेने भाजपचे कान टोचले. शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकातून अलिगड प्रकरणावरून मित्रपक्ष भाजपवर सेनेने टीका केली आहे. यावेळी सेलिब्रिटींवरही निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये उसने दिलेले १० हजार रुपये परत मागितले म्हणून अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भापजव चांगलीच आगपाखड केली आहे.
भाजपचा ‘बेटी बचाव’चा नारा फेल -
काँगेस राजवटीत ‘निर्भया कांड’ घडले तेव्हा ज्यांनी संसद चालू दिली नाही व महिला अत्याचाराविरोधात सरकारला कठोर कायदे करायला भाग पाडले. ते सर्व लोक आज सत्तास्थानी आहेत. तरीही राजरोसपणे अशा गोष्टी घडत असतील तर ‘बेटी बचाव’चा नारा अपयशी ठरत आहे.
वाचाळविरांना आवर घाला -
भाजपमधील अनेक नेते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असतात. अशा वाचाळविरांना आवर घालण्याचा सल्ला सेनेने दिला आहे. मागे बलात्काराच्या एका आरोपीस भाजप खासदार साक्षी महाराज खास जेलमध्ये जाऊन भेटले. त्यावर उत्तर प्रदेशात आता हंगामा सुरू आहे, असे भेटणे योग्य आहे का? अशा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला आहे.
काहींनी परंपरेप्रमाणे निषेधाच्या मेणबत्त्या पेटवल्या -
देशात वणवा पेटला असताना काहींनी परंपरेप्रमाणे निषेधाच्या मेणबत्त्या पेटवल्याची टीकाही सेनेनी केली. अक्षय कुमार, अनुपम खेर, अभिषेक बच्चन, सानिया मिर्झा अशा ‘उत्सव’ मंडळींनी या घटनेवर चीड, संताप व्यक्त करून दुःख व्यक्त केले आहे. ‘‘मी भयभीत आहे, अस्वस्थ आणि निराश आहे, अशी वरवरची वक्तव्ये फक्त हे सेलिब्रिटी करत असल्याचे यात म्हटले आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.