ETV Bharat / city

शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज; चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे २५ आमदार पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता शिवसनेनेचे 90 टक्के आमदार नाराज ( Shivsena 90 Percent MLA Not Happy ) असल्याचा गौप्सस्फोट चंद्रशेखर बावनकुळे ( Bjp Leader Chandrashekhar Bawankule ) यांनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule
author img

By

Published : Mar 30, 2022, 10:43 PM IST

मुंबई - विकास कामे मोठ्या प्रमाणात रखडल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज ( Shivsena 90 Percent MLA Not Happy ) असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( Bjp Leader Chandrashekhar Bawankule ) यांनी केला आहे. एकीकडे काँग्रेसचे २५ आमदार नाराज असून, आता शिवसेनेचे ९० टक्के आमदारही नाराज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या मुंबई कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची कामे रखडली? - महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्ष एकत्र आले. परंतु, त्यांच्यातील अंतर्गत वाद अजूनही कायम आहेत. शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत १०० जागा निवडून येतील, असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

अर्थसंकल्पातही स्वतःच्या पक्षातील आमदारांना खुश केले - नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात जाहीर झालेला अर्थसंकल्प केवळ कमिशन लाटण्याच्या हेतूने बनविण्यात आला होता. त्याचा सामान्यांना जराही फायदा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थसंकल्पातही स्वतःच्या पक्षातील आमदारांना खुश ठेवल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा - World Whistlers Champion : ओठाची हालचाल न करता कंठातून शिट्टी वाजवणारा अवलिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.