ETV Bharat / city

विनायक मेटे यांच्या वाहनाचा मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात उपचारादरम्यान मृत्यू - Shivsangram leader Vinayak mete death

विनायक मेटे यांच्या वाहनाचा खोपोलीजवळ भीषण अपघात झाला Vinayak mete car accident विनायक मेटे याना जबर मार लागला अशातच तात्काळ मदत मिळण्यास एक तास विलंब झाला तासाभराने मेटे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच मेटे यांचा मृत्यू झाला

विनायक मेटे
विनायक मेटे
author img

By

Published : Aug 14, 2022, 7:59 AM IST

Updated : Aug 14, 2022, 10:23 AM IST

मुंबई शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघाती Vinayak Mete death निधन झाले. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना Vinayak mete car accident त्याची प्राणज्योत मालवली. ते मराठा आरक्षण, शिवस्मारक आदी मुद्द्यांवरून सातत्याने भूमिका मांडत होते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. त्यांच्या निधनाने समाजाला मोठा हादरा बसला आहे. शिवसंग्रामचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःखद वृत्त समजले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आई-जगदंबा, मेटे कुटुंबीय व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद दे, अशी श्रद्धांजली खासदार अमोल कोल्हे यांनी वाहिली आहे.

त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत रात्री निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ सकाळी ५ च्या सुमारास गाडीला ट्रकने धडक दिली. या धडकेत कार बंपरमध्ये अडकली. विनायक मेटे याना जबर मार लागला. अशातच तात्काळ मदत मिळण्यास एक तास विलंब झाला. तासाभराने मेटे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच मेटे यांचा मृत्यू झाला. ते ५२ वर्षाचे होते. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक असेल किंवा मराठा समाजाचे न्यायहक्क असतील. मेटे यांनी सातत्याने आवाज उठवला होता. मात्र, त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

उपचार सुरू असतानाच मेटे यांचा मृत्यू विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत रात्री निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ सकाळी ५ च्या सुमारास गाडीला ट्रकने धडक दिली. या धडकेत कार बंपरमध्ये अडकली. विनायक मेटे याना जबर मार लागला. अशातच तात्काळ मदत मिळण्यास एक तास विलंब झाला. तासाभराने मेटे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच मेटे यांचा मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री रुग्णालयाच्या दिशेने रवाना मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मेटे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच अधिक माहिती देण्यास नकार दिला.

मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी नुकतेच मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले की, मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय Maratha Reservation रद्द झाल्यानंतर ठाकरे सरकारने समाजासाठी एकही निर्णय घेतला नसल्याची टीका विनायक मेटे Vinayak Mete यांनी महाविकास आघाडी सरकारवर Mahavikas Aghadi केली होती. तसेच शिवसेना कोणत्याच आरक्षणावर का बोलत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजासाठी विशेष राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा सरकारचा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय आहे. एका राज्यात 2 मागासवर्गीय आयोग असूच शकत नाहीत, असे ते म्हणाले होते.

शिवस्मारकासाठी आग्रही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात बांधण्यात येत येणारे शिवस्मारक हे बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असा आरोप शिवस्मारक समितीचे माजी अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला होता. या सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एल अँड टी कंपनीला नियमबाह्य मुदतवाढ दिल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात येते. मात्र, न्यायालयाच्या कचाट्यात स्मारकाच्या परवानग्या अडकल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही. तरीही बांधकाम कंपनीला मुदतवाढ दिल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला होता.

Last Updated : Aug 14, 2022, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.