ETV Bharat / city

. . आता युतीच्या गदेने विरोधकांना 'गदा गदा' हलवू - उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल स्मृती उद्यानाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी अटलजी फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते नव्हते, तर आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख होते, असे उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल भावना व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:33 PM IST

मुंबई - शिवसेनेच्यावतीने बोरिवली विभागातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गदा भेट देण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की मला आणि देवेंद्रजींना आत्ताच गदा दिल्या. या गदा आम्ही एकमेकांवर न घेता युतीच्या गदेने विरोधकांना गदा गदा हलवू. त्यांच्या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून बोरिवलीत साकारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

निवडणुकीतील निकाल हा ईव्हीएमचा घोळ नाही, तर त्या महान व्यक्तींच्या विचारांना फुटलेले धुमारे आहेत, असे उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत होणाऱ्या टीकेवरुन विरोधकांना दिले. आता युती झाल्यामुळे कोणाच्याही हक्कावर गदा येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे जेव्हा दोन खासदार होते, तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पराभव झाला म्हणून कधी राजीनामा दिला नाही. अशा परिस्थितीत मैदान न सोडता जो लढतो, तो खरा मर्द, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली. अटलजी फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते नव्हते, तर आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख होते, असे उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल भावना व्यक्त केली.

मेट्रो स्थानकाला देणार अटल स्मृती उद्यान नाव

बोरिवलीत उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाशेजारी असलेल्या मेट्रो स्थानकाला अटल स्मृती उद्यान असे नाव देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसा प्रस्ताव मेट्रोला देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विकासाचा सपाटा लावला आहे, त्याचा पाया अटलजींनी रचल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Intro:मुंबई - शिवसेनेच्यावतीने बोरिवली विभागातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गदा भेट देण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आणि देवेंद्रजींना आत्ताच गधा दिल्या. या गदा आम्ही एकमेकांवर न घेता युतीच्या गदेने विरोधकांना गदा गदा हलवू. निवडणुकीतील निकाल हा ईव्हीएमचा घोळ नाही तर त्या महान व्यक्तींच्या विचारांना फुटलेले धुमारे आहेत असे उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमवरून वारंवार होणाऱ्या टीकेला विरोधकांना दिले.
उपनगरीय पालकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून बोरिवलीत साकारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्घाटनाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

Body:आता युती झाल्यामुळे कोणाच्याही हक्कावर गदा येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपचे जेव्हा दोन खासदार होते तेव्हा त्यावेळच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पराभव झाला म्हणून कधी राजीनामा दिला नाही. अशा परिस्थितीत मैदान न सोडता जो लढतो खरा मर्द अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राजीनामा दिलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
अटलजी फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते नव्हते तर आपल्या सर्वांचे कुटुंबाचे प्रमुख होते असे उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल भावना व्यक्त केली.

Conclusion: मेट्रो स्थानकाला देणार अटल स्मृती उद्यान नाव
बोरिवलीत उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्याना शेजारी असलेल्या मेट्रो स्थानकाला अटल स्मृती उद्यान असे नाव देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसा प्रस्ताव मेट्रोला देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विकासाचा सपाटा लावला आहे त्याचा पाया अटलजींनी रचला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.