ETV Bharat / city

गोवंडीतील शिवाजीनगर मध्ये शिवसेनेचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन - Fuel price hike news

गोवंडी येथील शिवाजीनगर येथे शिवसेनेतर्फे इंधन दरवाढ केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेचे आंदोलन
शिवसेनेचे आंदोलन
author img

By

Published : Feb 5, 2021, 9:24 PM IST

मुंबई - गोवंडी येथील शिवाजीनगर येथे शिवसेनेतर्फे इंधन दरवाढ केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. इंधन दरवाढ कमी न झाल्यास भविष्यात वेगळ्या पद्धतीने शिवसेना रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशाराही शिवसैनिकांकडून देण्यात आला.

केंद्र सरकार विरोधात आंदोलन-

शिवसेना पक्ष प्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विभाग क्र.8 चे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर - मानखुर्द विधानसभा शिवसेना उपविभागप्रमुख तात्या सारंग, गणेश नायडू, हेमंत साळवी तसेच शिवसेनेचे नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष विठ्ठल लोकरे, नगरसेविका समिक्षा सक्रे यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात शिवसेना शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेच्या वतीने घाटकोपर -पनवेल लिंक मार्ग, शिवाजीनगर सिग्नल येथे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महिलाचा मोठा सहभाग होता. प्रज्ञा सकपाळ, टाजश्री मोरे, शारदाताई पालकट, सुनिता वत्रे, विधानसभा संघटिका किरन गावंडे, शबनम शेख, विधानसभा संघटक रमेश कोळी, सहसंघटक विधानसभा अन्वट सय्यद, शाखाप्रमुख अर्जुन शिंदे, एकनाथ खटाडे, उमाजी साळवी, अभिजीत सावंत, मनोज पाटील, कलाम खान, रोहित यादव, आरिफ सय्यद, युवासेना विभाग अधिकारी गणेश वाव्हळ, युवती विभाग अधिकारी शायनाज शेख, उपविभाग अधिकारी अरुण जगताप शाखाधिकारी प्रकाश वाघमारे इतर शाखेचे शाखाधिकारी अधिकारी युवासेना पदाधिकारी सर्व शाखेचे महिला शाखासंघटिका तसेच महिला/पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता.

हेही वाचा- विशेष: पेट्रोल डिझेलच्या किंमतीचा भडका, सर्वसामान्य हैराण! काय आहेत कारणे जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.