मुंबई ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास शिवसेना उद्धव गट कोर्टात जाणार आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. वरिष्ठाशी चर्चा करून जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल. पण जर राजीनामा मंजूर केला नाही तर शिवसनेने कोर्टात जाण्याची तयारी ठेवली असे माजी महापौर पेडणेकर यांनी सांगितले.
कोण आहेत ऋतुजा लटके? ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी असून, त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत तृतीय श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत होत्या. तर, रमेश लटके यांचा राजकीय जीवन प्रवास पाहता, त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेचे शाखाप्रमुख पदापासून झाली. त्यानंतर ते नगरसेवक झाले आणि त्यानंतर आमदार. असा एकूणच चढता क्रम हा रमेश लटके यांच्या राजकीय कारकीर्दीचा दिसून येतो.
अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील ठाकरेंच्या कोंडीसाठी उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke Resignation Case) यांच्या कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास मनपाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप केला जात होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा (Fadnavis clarification on Rituja Latke resignation ) करताना, कोणावरही दबाव नसल्याचे स्पष्ट केले. नियम सर्वांना सारखे असल्याचे ते म्हणाले. (update on Andheri East General Election)
ऋतुजा लटके यांचा महिन्याभरापूर्वीच राजीनामा, तरी मंजूरी नाही- अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी महानगरपालिका कर्मचारी पदाचा महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला. मनपा प्रशासनाकडून अद्याप मंजूर केलेला नाही. शिवसेना याविरोधात आक्रमक झाली आहे. तसेच शिंदे गट आणि भाजपकडून दबाव टाकला जात आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.