ETV Bharat / city

2022 महापालिका निवडणूक; शिवसेनेने पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग - विक्रोळी संक्रमण शिबिर

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त स्वबळावरच सत्ता आणायची. ती येणारच असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेने पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग

author img

By

Published : Oct 8, 2021, 2:53 AM IST

Updated : Oct 8, 2021, 6:07 AM IST

मुंबई - आगामी 2022 मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. विक्रोळी येथे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी आगामी निवडणुकीत महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, असा विश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विक्रोळीच्या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबियांना नवीन घरांच्या चाव्या गुरुवारी देण्यात आल्या. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. आशियातील सर्वात मोठे म्हाडा वसाहत असलेली विक्रोळीतील या संक्रमण शिबिरांत मधील इमारती या मोडकळीस आलेल्या होत्या. यामुळे या ठिकाणी राहणारे रहिवाशांचा जीव धोक्यात होता. आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने या रहिवाशांना नवीन संक्रमण शिबिरात घर देण्यात आली आहेत.

विक्रोळीच्या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबियांना नवीन घरांच्या चाव्या

हेही वाचा- भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट- नवाब मलिक

आम्ही गाजर वाटप करत नाही
पर्यावरण मंत्री या भागाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, देशातील राजकीय वातावरण बदलायचे आहे. देशात आपला बालेकिल्ला तयार करायचा आहे. बीडीडी पुनर्विकासाचा संबंधात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की मागील सरकार चावी नाही तर गाजर वाटप करायचे. आपण जे शब्द दिले आहेत ते पाळले आहेत. इथून कुठे जाऊ नका, मुंबईत राहा असे आवाहन आदित्य यांनी यावेळी मराठी माणसाला केले.

मागील सरकार चावी नाही तर गाजर वाटप करायचे

शिवसेनेची वेगळी चूल
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त स्वबळावरच सत्ता आणायची. ती येणारच असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आपली वेगळी चूल मांडणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

संपूर्ण मुंबई आमची बालेकिल्ला

हेही वाचा- कोल्हापुरातील अजित पवारांच्या बहिणीच्या घरासह कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे

शिवसेनेची लाट कायम असते
संजय राऊत म्हणाले, की संपूर्ण मुंबई आमची बालेकिल्ला आहे. पाऊस येतो पाऊस जातो. पण शिवसेनेची लाट कायम असते. 412 चाव्या करा आणि राज्याच्या विरोधीपक्षाला ती चावी द्या. आपण काय काम करतो, ते त्यांना कळू दे. या राज्याचे मुख्यमंत्री कष्टकऱ्यांना गती देणारे सरकार आहे. अन्न, वस्त्र व निवारा हा आपला धर्म आहे. शिवसेना तो पाळत आहे. मी दोन दिवसापूर्वी राहुल गांधींना भेटलो. ते मला नेहमी विचारत शिसवेनेचे यशाचे रहस्य काय? त्यांना मी सांगणार हे 411 घराच्या चाव्या हे रहस्य आहे. म्हणजे आम्ही काम करतो, असे त्यांना सांगणार आहे. मुबंई महानगरपालिका निवडणूक आली आहे. निवडणूका येतील आणि जातील भगवा कायम असेल. स्वबळावर भगवा फडकावायचा आहे.

हेही वाचा- शिवसेना गुजरातेत निवडणूक लढवणार, दादरा नगर हवेली पोटनिवणुकीसाठी कलाबेन डेलकारांना उमेदवारी जाहीर

Last Updated : Oct 8, 2021, 6:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.