ETV Bharat / city

केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते.. - केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी

मागील वर्षभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी, सीबीआय, आयटी यांचा ससेमिरा हा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलेला आहे. या संदर्भातच सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सह्याद्री अतिथगृहात सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.

PAWAR THACKERAY
PAWAR THACKERAY
author img

By

Published : Oct 19, 2021, 5:34 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला सध्या चिंता लागली आहे ती केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कसा थांबवायचा याची. मागील वर्षभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी, सीबीआय, आयटी यांचा ससेमिरा हा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलेला आहे. त्यातच भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया हे सातत्याने नव-नवीन भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर करत असल्याने या दोन्ही पक्ष प्रमुखांची झोप उडाली आहे. या संदर्भातच सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सह्याद्री अतिथगृहात सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.

कोरोनानंतर सरकारपुढे केंद्रीय तपास यंत्रणांची डोकेदुखी -

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला दीड वर्ष त्या उपाययोजनांवर घालवावी लागली. त्यानंतर आता कुठे हा आजार आटोक्यात आला आहे. एकीकडे जनजीवन सुरळीत होत असताना केंद्रीय यंत्रणेचा तपास महाविकास आघाडीसाठी आता डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यातच राज्यातली वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या या सर्व मुद्द्यांवर हे सरकार अपयशी ठरत असताना मुंबई महानगर केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असलेल्या छापेमारीला प्रखर विरोध करण्यासाठी शरद पवार व मुखयमंत्री उद्वव ठाकरे यांच्यात डावपेच आखण्यासाठी चर्चा झाली. भ्रष्टाचार प्रकरणात असेच महाविकास आघाडीतील नेते गुंतलेले राहिले तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, ही जाणीव सुद्धा या उभय नेत्यांना आहे.

हे ही वाचा -खोटे गुन्हे दाखल केले तरी दबावापुढे आघाडी सरकार झुकणार नाही - नवाब मलिक

तपास यंत्रणांपासून काँग्रेस अलिप्त -

मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने यापूर्वी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यातच काँग्रेसच्या तुलनेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते अडकलेले आहेत. शिवसेना नेते प्रताप सरनाईक, मंत्री अनिल परब, माजी मंत्री रवींद्र वायकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार भावना गवळी आदि नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. यामधील काही नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा - नवं हिंदू म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोणाला डिवचले? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार!

अजित पवारांच्या घरावर छापेमारीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली -

मागील आठवड्यात अजित पवार यांच्या भगिनींच्या घरावर आयटीने टाकलेल्या छापेमारीने संपूर्ण पवार कुटुंबासहित राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणेचा लागलेला हा ससेमिरा बघता सध्या तरी राज्यात काँग्रेसने बघ्याची भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे. त्याचेच उदाहरण म्हणून सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन पक्षप्रमुखांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा थांबवण्यासंदर्भात चर्चा झाली.

या अगोदर किरीट सोमैया यांनी माजी काँग्रेस नेते व मंत्री कृपाशंकर सिंह, माजी काँग्रेस नेते व मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीचे माजी नेते व मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु कालांतराने हे नेते भाजपवासी झाल्याने त्यांच्यावरील आरोप थंड झाले हे सुद्धा विशेष.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.