ETV Bharat / city

Shiv Sena MP Sanjay Raut : 'कुठं आहेत आमचे राज्यपाल?' खासदार संजय राऊतांनी राज्यपालांना सुनावले

Shiv Sena MP Sanjay Raut : राज्यात सरकार अस्तित्वातच नाही, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.

संजय राऊतांनी राज्यपालांना सुनावले
संजय राऊतांनी राज्यपालांना सुनावले
author img

By

Published : Jul 14, 2022, 1:20 PM IST

मुंबई - एका बाजूला मुसळधार पाऊस ( heavy rain ) सुरू आहे, या नैसर्गिक संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलंय सोबतच साथीचे रोग ( Epidemic ) पसरत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राजकारणात राष्ट्रपती ( President ) पदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत ( Mumbai ) येत आहेत. मुंबई दौऱ्यात त्या समर्थक आमदार खासदारांच्या बैठका घेणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावर आता शिवसेनेचे ( Shivsena ) नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊतांनी राज्यपालांना सुनावले

म्हणून दिला पाठिंबा... - यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती ( President ) पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन दिलेलं आहे. याच्या मागे कोणतेही राजकीय समीकरण नाही, राजकीय ( Political ) गणित नाही की, नफा तोटा नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्या ओडिशा सारख्या राज्यातील एका मागासल्या आदिवासी भागातुन येतात. आणि देशात प्रथमच एका मागासल्या भागातून येणारी महिला राष्ट्रपती होते. हे देशासाठी अभिमान आहे. महाराष्ट्रात देखील अनेक आदिवासी भाग आहेत. पालघर, ठाणे, मेळघाट असे अनेक आहेत. आमचे अनेक आमदार, खासदार देखील आदिवासी भागातून येतात आणि त्यामुळेच आम्ही त्यांना समर्थन देत आहोत." अशी प्रतिक्रिया संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन सारखी स्थिती - राज्यात मुसळधार पावसामुळे नैसर्गिक संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. अशात अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "हे सरकार स्थापन होऊन जवळपास 12 ते 15 दिवस झाले, पण अद्याप काहीच सुरू झालेले नाही. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊन सारख्या स्थितीमध्ये गेलेला आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल. या मुसळधार पावसाच्या स्थितीमुळे मागच्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्रात साधारण 100 जणांनी आपला जीव गमावलेला आहे. अनेक भागांमध्ये कॉलरचा थैमान निर्माण झाला आहे. तिथेही सर्व गोंधळ आहे. अशा परिस्थितीत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या क्षपता घेऊन बसणे म्हणजे सरकार अस्तित्वात आला असं होत नाही."

हे बेकायदेशीर सरकार - पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "बारा दिवस होऊन गेले तरी सरकार स्थापन होत नाही. अशी परिस्थिती यांच्यावर का आली. कारण हे बेकायदेशीरपणे स्थापन केलेले सरकार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात आमच्याकडून तिकडे गेलेले काही आमदार अपात्र ठरू शकतात आणि अशा अपात्र आमदारांना शपथ देणे हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजगृह आणि एक राजकीय भ्रष्टाचार आहे. याची भीती असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यांचा शपथविधी रोखला गेलेला आहे." अशी सडकून टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

या सर्व भावी मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ राज्यपाल देतात - राज्यपाल विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अशा कोणत्याही प्रकारच घटना द्रोही कृत्य राज्यपालांनी करू नये, अशा प्रकारचे पत्रच आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. घटनेचे पालन यापूर्वी केलं नाहीत किमान आता तरी करा. आता कुठे आहेत आपले राज्यपाल ? महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, महापुरात सारखी स्थिती आहे. कॉलरचा थैमान आहे, लोकांचे मृत्यू होत आहेत, कुठे आहेत आमचे राज्यपाल ? ते काही झालं, तरी कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करायचे. आता तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, आता करा मार्गदर्शन." अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना खडे बोल लावले आहेत.

हेही वाचा - Draupadi Murmu Mumbai Visit : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.