मुंबई - गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकरला तिकीट नाकारले आहे. त्यामुळे उत्पल यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आता या वादात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. सगळ्यांनी मिळून उत्पल यांना मदत केली पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी भाजपइतर पक्षांना केले आहे.
भाजपने पर्रिकरांच्या कुटुंबासोबत एकप्रकारचे वैर घेतले
गोव्याच्या विकासात मनोहर पर्रिकरांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे गोव्यात भाजपला ताकद देण्यातही पर्रिकरांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाजपने विचार करायला हवा अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाने पर्रिकरांच्या कुटुंबासोबत एकप्रकारचे वैर घेतले आहे. आणि हे भाजपने घेतलेले वैर कुणाच्या मनाला पटणारे नाही असही राऊत म्हणाले आहेत.
सर्व पक्षांनी उत्पल यांच्या पाठिशी उभं राहायला हवे
उत्पल पर्रिकर यांनी पणजी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला आहे. मात्र, भाजप उत्पल यांना तिकीट देण्यास अनुकुल नाही. परंतु, उत्पल त्या जागेवर ठाम आहेत. त्यामुळे सध्या उत्पल पर्रिकर आणि भाजप असा सामना रंगला आहे. त्यामध्ये आता संजय राऊत यांनी उडी घेत आपण भाजपइतर पक्षांनी उत्पल यांच्या पाठिशी उभं राहायला हवे असे आवाहन केले आहे.
हेही वाचा - OBC Political Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी