ETV Bharat / city

MLC Opposition Leader :अंबादास दानवेंची विधानपरिषद विरोधीपक्ष नेते पदी नियुक्ती; शिवसेना विरुद्ध शिंदे गट सामना रंगणार? - शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे

विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे ( MLC Leader of Opposition MLA Ambadas Danve ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळाने याला मान्यता दिल्याने शिवसेना आणि शिंदे गट असा सामना विधानभवनात रंगणार आहे.

Ambadas Danve
Ambadas Danve
author img

By

Published : Aug 10, 2022, 2:56 PM IST

मुंबई - बंडखोर शिंदे गटाचे राज्यात सरकार आल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असा वाद सुरू आहे. न्यायालयातही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे ( MLC Leader of Opposition MLA Ambadas Danve ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळाने याला मान्यता दिल्याने शिवसेना आणि शिंदे गट असा सामना विधानभवनात रंगणार आहे.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचे चिन्ह मिळावे यासाठी संघर्ष सुरु आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी, असे पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवेसना पक्षास अधिकृत विरोधीपक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा - Eknath shinde cabinet minister portfolios - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास, सामान्य प्रशासन तर फडणवीसांना गृह व वित्त खातं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.