मुंबई - राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण? असा सवाल पुन्हा एकदा शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे Shiv Sena MLA and leader Aditya Thackeray यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे स्वतः निर्णय घेतात का? असे म्हणत विधानभवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा सवाल Aditya Thackeray criticized state government उपस्थित केला. यासोबतच विरोधकांकडून पन्नास खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा देत असताना सरकारमधील मंत्री हे खोके तुम्हाला पाहिजेत का? अशी विचारणा करत म्हणजे त्यांना खोके भेटले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसेनेशी बंडखोरी करत जे बाहेर पडले ते गद्दारचे आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसायचे काम या आमदारांनी केले. त्यामुळे त्यांना गद्दार म्हणणार नाही तर काय म्हणणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
'तथाकथित हिंदुत्ववादी सरकार' : राज्यामध्ये आलेले सरकार हे तथाकथित हिंदुत्ववादी विचारांचा सरकार आहे. पुण्यामध्ये अफजलखान वधाचा देखावा दाखवण्याला परवानगी राज्य सरकारने दिली नाही. हे सरकार केवळ निर्णय घेते मात्र ते निर्णय अमलात आणले जात नाहीत. दहीहंडी संदर्भात देखील निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र तो देखील अंमलात आणलेला नाही. याबाबतचा शासन निर्णय अजून निघालेला नाही. पाच टक्के नोकरी गोविंदांना खेळाडू कोट्यातून दिली जाईल, असे राज्य सरकार सांगते. मात्र ती नोकरी कशी दिली जाईल, याबाबत काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे राज्य सरकार केवळ निर्णय घेते. मात्र त्याची अंमलबजावणी बाबत कोणतेही धोरण आखले जात नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
'जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या सूचना' : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या मातोश्रीच्या बैठकीतून शिवसैनिकांना आणि शिवसेना नेत्यांना जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याचा आदेश दिला आहे. सध्या राज्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसला. याबाबत राज्य सरकार काहीही करत नाही, अशा वेळेस मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीत हे मुद्दे घेऊन जनतेत जाण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच आज महाविकास आघाडीमधील नेत्यांची बैठक होणार असून सायंकाळी होणाऱ्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
'जनतेच्या प्रश्नांशी सरकारला देणे घेणे नाही' : राज्यामध्ये सरकार आल्यापासून जनतेच्या हिताचा एकही मुद्दा सरकारने मार्गी लावला नाही. केवळ राजकारण करण्यापलीकडे भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गट काहीही करत नाही. दहीहंडीसाठी जांबोरी मैदान मिळावे या यामध्ये देखील राजकारण झाले. मात्र जांभोरी मैदानामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केल्यानंतर आयोजकांनी सुस्थितीत मैदान पुन्हा जनतेला परत करणे गरजेचे होते. मात्र आयोजकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तसेच बेस्टमध्ये इलेक्ट्रिक बस आणताना त्याचा राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी यादी केला होता. मात्र आता महानगरपालिकेच्या डबल-डेकर इलेक्ट्रिक बसतो उद्घाटन हे स्वतः नेते करत आहेत, असा चिमटा आदित्य ठाकरे यांनी काढले.
हेही वाचा - Petitions Referred to Constitution Bench महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्व याचिका घटनापिठाकडे वर्ग