ETV Bharat / city

'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?' सामनातून भाजपाचा समाचार

author img

By

Published : Dec 30, 2020, 7:22 AM IST

Updated : Dec 30, 2020, 1:52 PM IST

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपावर हल्लाबोल केला आहे. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे. 'ईडी'च्या बाबतीत ज्यांना 'घटना' आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. सध्या एक संवाद सर्वत्र गाजतो आहे तो म्हणजे, 'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?' त्यातलाच हा प्रकार आहे, अशी टीका अग्रलेखातून केली आहे.

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेली नोटीस आणि विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य निवडण्यासाठी पाठवलेल्या 12 जणांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपावर हल्लाबोल केला आहे.' ईडी ' वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे. हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहे. तो भाजप आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण हेच भाजपचं भविष्य आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग -

महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे 'ईडी' प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका 'महात्म्या'ने 'ठाकरे सरकार' पाडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी 'ईडी पिडी'च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

घटना कोणाला शिकवता?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता घटनेचा प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, 'ईडी वगैरे संस्था या बिगर राजकीय असून त्या घटनेशी बांधील आहेत. त्यामुळे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही का? 'पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. घटनेची सगळय़ात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?'

2020 चे ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे 'ईडी'च्या बाबतीत ज्यांना 'घटना' आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. सध्या एक संवाद सर्वत्र गाजतो आहे तो म्हणजे, 'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?' त्यातलाच हा प्रकार! 'ईडी' वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताच त्यांना 'ईडी'ची नोटीस यावी याला काय घटनेच्या चौकटीत राहत केलेले कार्य म्हणावे? आंध्र प्रदेशातील 'टीडीपी' खासदारांच्या घरावर ईडीच्या धाडी पडताच भेदरलेली मेंढरं निमूट भाजपच्या कळपात सामील झाली. ईडीचा प्रयोग लालू यादवांच्या बाबतीत फसला, अशी टीका अग्रलेखातून केली आहे.

ईडीकडून पौरोहित्याचे काम -

प. बंगालात ईडीचा धाक दाखवून रदा चीट फंड घोटाळय़ातील मुकुल राय वगैरे मंडळी एका रात्रीत भाजपमध्ये घुसली. भाजपमध्ये सामील होताच असे सर्व लोक शुद्ध करून घेतले जातात व ईडी याकामी पौरोहित्याचे काम करीत असते. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे. कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही, असं म्हणत 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर ताशेरे ओढण्यात आलेत.

ईडीचा गैरवापर -

सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत?, असा परखड सवाल अग्रलेखातून केला आहे.

हेही वाचा - संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 'ईडी'ने पुन्हा बजावले समन्स

Last Updated : Dec 30, 2020, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.