मुंबई - भाजपने चार बंडखोरांवर केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेतही कारवाईची सूत्रं हलली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पाच जणांवर पक्षाने कारवाई केली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
उस्मानाबादमध्ये अजित पिंगळे, सुरेश कांबळे माढा लोकसभेत महेश चिवटे, सोलापूरमध्ये प्रवीण कटारिया, महेश कोठे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे(पूर्व)मध्ये माजी आमदार व अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत, वर्सोव्यात राजुल पटेल आणि घाटकोपर पश्चिम मध्ये सुरेश भालेराव यांच्यावर कारवाई बाबत पक्षनेतृत्वाचे अजून आस्ते कदम आहे.