ETV Bharat / city

Shiv Sena Gurupournima : बंडखोरीनंतर 'अशी' झाली शिवसेनेची 'गुरुपौर्णिमा' - गुरुपौर्णिमा शिवसेना दादर

गुरुपौर्णिमेला हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन करतात तर काहीजण मातोश्रीलाच मंदिर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री गाठतात. मात्र, पहिल्यांदाच शिवसेनेत एवढी मोठी फूट पडल्याने जवळपास अर्धा पक्ष रिकामा झाला. यंदाची गुरुपौर्णिमेत शिवसेनेचे दोन भाव पाहायला मिळाले.

Shiv Sena Gurupournima
Shiv Sena Gurupournima
author img

By

Published : Jul 13, 2022, 8:57 PM IST

मुंबई - आज गुरु पौर्णिमा. राजकीय दृष्ट्या शिवसेनेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी गुरु पौर्णिमेला अनेक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत असतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेला हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन करतात तर काहीजण मातोश्रीलाच मंदिर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री गाठतात. मात्र, पहिल्यांदाच शिवसेनेत एवढी मोठी फूट पडल्याने जवळपास अर्धा पक्ष रिकामा झालेला असताना शिवसेनेच्या या गुरुपौर्णिमेत नेमकं काय बदल झाला त्याचा घेतलेला हा आढावा.

गुरुपौर्णिमा आणि शिवसेना : शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनही तसेच समानार्थी शब्द. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आणि त्यांच्या मुंबईतील अस्तित्वाचा प्रश्न वारंवार उपस्थित केला होता. 'उठाव लुंगी बजाव पुंगी' अशा त्यांच्या घोषणा आज देखील अजरामर आहेत. इतकच नाही तर 1992-93 च्या हिंदू मुस्लिम दंगलीत शिवसेनेने घेतलेली भूमिका देखील निर्णायक राहिली आहे. यानंतर बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान वाढतच गेलं. त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात त्यांचा चाहता वर्ग वाढू लागला. हे चाहते बाळासाहेबांना गुरुस्थानी मानत. बाळासाहेब हयात असताना हजारो शिवसैनिक ठाकरे कुटुंबियांचे निवासन असलेल्या मातोश्रीला मंदिर मानून त्यांना अभिवादन करण्यासाठी मातोश्रीवर येत. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिकांना मातोश्री व दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब यांचं स्मृतिस्थळ अशी दोन ठिकाण तयार झाली.

अर्ध्याहून अधिक पक्ष रिकामा : शिवसेनेच्या जवळपास 56 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं बंड झालं. स्वतःला कट्टर शिवसैनिक व बाळासाहेबांचे कडवट भक्त म्हणून घेणारे एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह जवळपास 50 आमदारांनी ब बंडखोरी केली. आणि, अर्ध्यापेक्षा अर्ध्याहून अधिक शिवसेना रिकामी झाली. आजच्या घडीला शिवसेनेतच दोन गट आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदे दुसरा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा. एकनाथ शिंदे गट हा आपणच ओरिजनल बाळासाबांची शिवसेना असल्याचा दावा करतोय. त्यामुळे या राजकारणाचा देखील आजच्या गुरुपौर्णिमेवर परिणाम झालेला पाहायला मिळाला.

बंडखोर गट स्मृतिस्थळावर : उद्धव ठाकरे यांच्या सोबतच फारकत घेतल्याने सहाजिकच आहे एकनाथ शिंदे यांचा बंडखोर गट मातोश्रीवर जाणार नाही. मात्र, 50 आमदार असलेल्या गटाने दादरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाकडे देखील पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. या बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, आमदार डॉ.बालाजी किणीकर असे पाच जणच उपस्थित होते.

'साहेब नमस्कार करा' : हे पाच बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलेखरे पण, हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी चाफ्याची फुले स्मृतिस्थळावर अर्पण करून तसेच उभे राहिले. तिथं वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या छायाचित्र पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सोबतच्या आमदारांना सांगितलं 'साहेब नमस्कार करा' त्यावेळी या सर्वांना आपली चूक लक्षात आली व सर्वांनी हात जोडला. आठवण करून दिल्यावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुडघ्यावर खाली बसून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

ठाकरे गटाकडून कोण? : शिंदे गटासारखेच काहीशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या समर्थक आमदारांचे देखील पाहायला मिळाले. या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर येऊन अभिवादन न करता थेट मातोश्री गाठली उद्धव ठाकरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. थेट मातोश्री गाठलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या आमदारांपैकी फक्त नीलम गोरे वगळता इतर कोणीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाकडे फिरकले नाही. नीलम गोरे यांच्यासोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष किशोरी पेडणेकर या उपस्थित होत्या व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या मात्र आमदार कोणही नव्हते.

हेही वाचा - CM Eknath Shinde: ..बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच! गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाष्य? वाचा, सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.