ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा; वृत्त निराधार असल्याचे शिवसेनेने केले स्पष्ट - देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा

मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेऊन विश्वास घात केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीत मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे वृत्त माध्यमात पसरत आहे. मात्र शिवसेनेने हे वृत्त फेटाळले आहे.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 28, 2022, 1:11 PM IST

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मध्यस्थी करण्याची चर्चा केल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केले आहे. मात्र ते निराधार आणि निव्वळ दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे.

निष्ठावंत आमदारांनी दिला दगा - शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय मानले जातात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा किंवा त्यांना सांगितल्याशिवाय भूमिका स्पष्ट करत नव्हते. त्याच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेऊन विश्वास घात केला. केवळ एक नव्हे तर तब्बल 51 आमदारांना सुरतमध्ये नेऊन बंड पुकारले. आतापर्यंत एक एक करत संपूर्ण आमदार गळाला लावले. मुख्यमंत्री ठाकरे यांना यामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. त्यातूनच निष्ठावंत आमदारांनी दगा दिल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार, एच. के. पाटील, कमलनाथ यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्षप्रमुख पद सोडणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद न सोडण्याचा सल्ला दिला होता.

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस संपर्क - विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले. 21 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून युतीबाबत चर्चा केल्याचे वृत्त प्रसारित झाले. मात्र शिवसेनेने या वृत्त फेटाळून लावले आहे.

शिवसेनेकडून करण्यात आले आवाहन - शिवसेनेचे स्पष्टीकरण सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला, अशाप्रकारच्या बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असेही आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.