ETV Bharat / city

Shivsena Vs BJP in BMC : पावसाळी आजारांच्या औषध खरेदीचा हिवाळ्यात वाद, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली!

author img

By

Published : Nov 30, 2021, 8:09 PM IST

Updated : Nov 30, 2021, 9:24 PM IST

पावसाळी आजारांच्या औषधांसाठीच्या खरेदीचा प्रस्तावावरून विरोधी पक्षाने मुंबई महापौर कार्यालयाला लक्ष्य केले आहे. वास्तविक ही चूक महापौर कार्यालयाची नसून प्रशासनाची असल्याचे शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी त्यांनी मागणी केली आहे

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई - पावसाळी आजारांच्या औषधांसाठीच्या खरेदीचा प्रस्ताव गेल्या ८ महिन्यांपासून मुंबई महापौराच्या कार्यालयात प्रलंबित आहे. या प्रस्तावाची फाईल गहाळ झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीतही उमटले होते. तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे.

पावसाळी आजारांच्या औषधांसाठीच्या खरेदीचा प्रस्तावावरून ( BJP clash over medicine buying in BMC ) विरोधी पक्षाने मुंबई महापौर कार्यालयाला लक्ष्य केले आहे. वास्तविक ही चूक महापौर कार्यालयाची नसून प्रशासनाची असल्याचे शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत ( Vishakha Raut slammed BJP ) यांनी म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजपाने चौकशी करून आरोप करावेत, असा त्यांनी भाजपला सल्ला दिला आहे. हा या प्रकार म्हणजे खोदा पहाड निकाला चुहा, असल्याचा टोलाही राऊत यांनी शिवसेनेला लगावला आहे.

सत्ताधारी शिवसेनेचे बाजू मांडताना सभागृह नेत्या

हेही वाचा-Venkaiah Naidu on MPs suspension : 12 खासदारांचे निलंबन मागे घेता येणार नाही- व्यंकय्या नायडू

भाजपचा आहे आरोप-

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळी आजारांचे रुग्ण वाढतात. त्यांना लागणारी औषधे खरेदी करण्याची फाईल महापौर कार्यालयातून गहाळ झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार मिहीर कोटेचा ( BJP MLA Mihir Kotecha slammed Shivsena ) यांनी केली आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे.

हेही वाचा-Mumbai School Reopening : मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार

शिवसेनेने हा केला खुलासा-

शिवसेनेच्या खुलाशाप्रमाणे महापौरांना ७५ लाख रुपयांपर्यंतचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार आहेत. असे असताना महापौरांकडे ५० कोटीहून अधिक रक्कमेची फाईल प्रशासनाने महापौरांकडे पाठवून प्रशासनाने चूक केली, असा आरोप विशाखा राऊत यांनी केला. वेगळ्या विषयांची व ७५ लाखांच्या खर्चाची फाईल पाठवणे गरजेचे असताना एकत्र विषय करून फाईल पाठवली. ही आपली चूक झाल्याचे प्रशासनाने कबुल केली आहे.

हे शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र-

प्रशासनाच्या चुकीमुळे महापौर कार्यालय अडचणीत ( Mumbai Mayor office in trouble ) आले आहे. ज्यांनी हा प्रकार केला आहे, ज्यांनी हा प्रस्ताव बनवला तो चुकीचा बनविला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे महापौरांना मनस्ताप झाला आहे. मार्चमध्ये महापौर कार्यालयाकडे फाईल आल्याबर ती हातोहात खरेदी विभागाचे प्रमुख अधिकारी रमाकांत बिराजदार यांच्याकडे दिली होती. तशी नोंद महापौर कार्यालयात आहे. त्यानंतरही दोन वेळा महापौर कार्यालयाला स्मरणपत्र पाठवली गेली. हा महापौर कार्यालयाला बदनाम करण्याचा प्रकार आहे. भाजपने या प्रकरणाची चौकशी करून नंतर आरोप करायला हवा होते. मात्र, त्यांनी उगाच बाऊ केला. हे शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी राऊत यांनी केली.

हेही वाचा-Param Bir Waze Meeting : सिंग-वाझे भेटीबाबत चौकशीचे आदेश - गृहमंत्री वळसे

फाईल झाली गहाळ -
महापालिकेकड़ून पावसाळी आजारासंबंधित औषधे खरेदी केली जातात. हा प्रस्ताव महत्त्वाचा असताना ८ महिन्यांपासून महापौर कार्यालयात रखडला. विशेष म्हणजे याबाबतची फाईलही गहाळ झाल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. औषधे पावसाळ्यात साथीच्या आजारांसाठी असल्याने महत्त्वाचे होते. मात्र असे असतानाही या प्रस्तावाकडे महापौर कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे ( Prabhakar Shinde on Medicines buying ) यांनी केला. यासंबधीत असलेली फाईल महापौर कार्यालयाकडे ८ महिने प्रलंबित राहिली. त्यानंतर फाईल गहाळ झाल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. महापौर कार्यालयाकडून हा हलगर्जीपणा करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्थायी समितीत निदर्शनास आणले. दरम्यान प्रस्तावाबाबतचा आक्षेप योग्य असला तरी यात महापौर कार्यालयाचा उल्लेख करणे चुकीचा आहे, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी आयुक्तांकडे परत पाठवत असल्याचे जाहीर केले.

Last Updated : Nov 30, 2021, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.