मुंबई - युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशात अनेक भारतीय युक्रेनमध्ये ( Indian Students in Ukraine ) अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ( Sharad Pawar spoke with EAM Jaishankar ) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोड (रशिया) मार्गावरून बाहेर काढण्यावर दोघांनी चर्चा केली. तसेच रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबतही चर्चा झाली.
-
#WATCH | Prime Minister Narendra Modi calls a high-level meeting on the Ukraine crisis. Some Union Ministers may go to neighboring countries of Ukraine to coordinate the evacuations.#RussiaUkraineCrisis pic.twitter.com/yqTFYwspxo
— ANI (@ANI) February 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Prime Minister Narendra Modi calls a high-level meeting on the Ukraine crisis. Some Union Ministers may go to neighboring countries of Ukraine to coordinate the evacuations.#RussiaUkraineCrisis pic.twitter.com/yqTFYwspxo
— ANI (@ANI) February 28, 2022#WATCH | Prime Minister Narendra Modi calls a high-level meeting on the Ukraine crisis. Some Union Ministers may go to neighboring countries of Ukraine to coordinate the evacuations.#RussiaUkraineCrisis pic.twitter.com/yqTFYwspxo
— ANI (@ANI) February 28, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे सुचवले होते. निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
'ऑपरेशन गंगा' -
रशिया - युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने हालचाली सुरू करून विमाने पाठवली आहे. यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेण्यात आलं आहे. युक्रेनमध्ये भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते.
महाराष्ट्र सरकारचा हेल्पलाइन क्रमांक -
महाराष्ट्र राज्य सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी 02222027990 हा हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. तसेच 9321587143 या व्हॉट्सअप नंबरवरही संपर्क करता येईल. Control room@maharashtra. gov.in हा ईमेल उपलब्ध करून दिला आहे. तसेच युक्रेनमधील सीमाभागाजवळ असणाऱ्या चेकपोस्टवरून भारतीयांना बाहेर काढण्यात येत आहे. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येत आहे. सीमा भागात असणाऱ्या भारतीयांना प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीयांना बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
संजय राऊत यांची केंद्रावर टीका
युक्रेनमधून ६८८ भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले. यावेळी बोलताना सिंधिया यांनी अनेकदा मोदींचा उल्लेख केला. त्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, की केवळ १५० ते २०० लोकांना परत आणून मोदी सरकार याची जाहिरातबाजी करत आहे. युक्रेनमध्ये सुमारे १५ हजार भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना परत आणायला हवे. भारतीयांना युक्रेनमध्ये मारहाण झाली. असे यापूर्वी कधीही झाले नाही.
हेही वाचा - EXPLAINER : भारतावर रशिया युक्रेन वादाचा काय होणार परिणाम? जाणून घ्या या व्हीडीयोतून....