ETV Bharat / city

Sharad Pawar On Narendra Modi : पंतप्रधान मोदींची सत्ता स्थापनेची ऑफर ते अजित पवारांचा शपथविधी, शरद पवारांचा मोठा खुलासा

author img

By

Published : Dec 30, 2021, 1:16 PM IST

Updated : Dec 30, 2021, 1:34 PM IST

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बुधवारी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेसंदर्भातील ( Sharad Pawar Speak About Ajit Pawar Oath ) अनेक खुलासे केले आहेत. मुंबईत आयोजित ( Sharad Pawar Mumbai Program ) एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता ( Modi Offer To NCP For Government Formation ) स्थापनेची ऑफर दिली होती, असाही खुलासा केला.

Sharad Pawar News
Sharad Pawar News

मुंबई - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बुधवारी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेसंदर्भातील ( Sharad Pawar Speak About Ajit Pawar Oath ) अनेक खुलासे केले आहेत. मुंबईत आयोजित ( Sharad Pawar Mumbai Program ) एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता ( Modi Offer To NCP For Government Formation ) स्थापनेची ऑफर दिली होती, असाही खुलासा केला. तसेच अजित पवारांच्या सकाळच्या शपथ विधीवरही त्यांनी भाष्य केले.

काय म्हणाले शरद पवार? -

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारवर अनेक शाब्दीक हल्ले केले. त्यामुळे मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, राज्याच्या विकामाच्या आड सुडाचे राजकारण येऊ नये, असे मत मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे व्यक्त केले होते. ते मनमोहन सिंग यांनीही मान्य केले. मोदींशी संवाद साधण्यासाठी माझ्याशिवाय कोणीही इच्छूक नव्हते. काँग्रेसमधील अनेकांनी मोदींविरोधात टोकाची भूमिका घेतली होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

'...तर सरकार दिसेल असते' -

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी घेतलेल्या शपथविधी संदर्भातही शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, '2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेण्यासाठी अजित पवार यांना, शरद पवारांनी पाठवल्याच्या चर्चेसंदर्भात त्यांना विचारले असता, ते म्हणाले, मी अजित पवार यांनी शपथविधीसाठी पाठवले असते. तर सरकार बनवले असते, असे अर्धवट काम केले नसते.

हेही वाचा - Kalicharan Maharaj Arrested : महात्मा गांधींबद्दल प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कालीचरण महाराजाला बेड्या

Last Updated : Dec 30, 2021, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.