मुंबई - आयएनएस विक्रांत युद्धनौका ( INS Vikrant Case ) भंगारात जाऊ नये म्हणून 2013 साली भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैयांनी जनतेकडून पैसा गोळा केला. त्यातून जमा झालेली रक्कम किरीट सोमैयांनी भारतीय नौदल किंवा आमफोर्स तेथे देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे न करता, जमा केलेला सर्व पैसा पक्षाला दिला. हे आक्षेपार्ह असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त ( Sharad Pawar On Kirit Somaiya ) केले. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
घरावर हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना दोष नाही - शरद पवार म्हणाले की, आपल्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. पण, या हल्ल्यासाठी आपण कधी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी नेतृत्व चुकीचे निवडे. ती व्यक्ती रोज माझे नाव घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीबाबत आपण जबाबदार असल्याची टीका करत होती. या परिस्थितीला आपण जबाबदार असल्याचा एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात टाकण्यात आल. त्यामुळे कामगारांना आंदोलनासाठी रस्त्यावर आणणारे जबाबदार आहेत. घरावर हल्ला प्रकरणी आपण एसटी कर्मचाऱ्यांना दोषी मानत नाही. तसेच, घरावर हल्ल्याप्रकरणी ज्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्याबाबत सर्वस्वी निर्णय संबंधित खात्याचे प्रमुख म्हणून अनिल परब यांनी घेतला आहे. तसा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आज मंत्रालयात आले याचा आनंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वतः मंत्रालयात दाखल झाले. जवळपास दीड वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात आपल्या कार्यालयात आले असल्याने आपल्याला आनंद झाला आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री कार्यालयात आले नसले तरी, आपल्या शासकीय निवासस्थानापासून राज्याचा कारभार ते करत होते. राज्याच्या कोणतेही काम त्यामुळे थांबले नाही. मुख्यमंत्री यांच्या खराब असलेल्या तब्येतीमुळे गेले काही दिवस त्यांना मंत्रालयात येता येत नव्हते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयात हजर असत. लोकांच्या कामासाठी भरपूर वेळ देतात याची आठवण देखील, शरद पवार यांनी दिली आहे.
-
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी पैसे गोळा केले असतील तर त्याचा विनियोग काय केला, याची माहिती बाहेर येणे गरजेचे आहे. माध्यमांद्वारे मिळालेली माहिती खरी असल्यास लोकांच्या भावनेला हात घालून जर विक्रांतसाठी पैसे गोळा केले असतील तर ते राजकीय पक्षाकडे का दिले?
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी पैसे गोळा केले असतील तर त्याचा विनियोग काय केला, याची माहिती बाहेर येणे गरजेचे आहे. माध्यमांद्वारे मिळालेली माहिती खरी असल्यास लोकांच्या भावनेला हात घालून जर विक्रांतसाठी पैसे गोळा केले असतील तर ते राजकीय पक्षाकडे का दिले?
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 13, 2022आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी पैसे गोळा केले असतील तर त्याचा विनियोग काय केला, याची माहिती बाहेर येणे गरजेचे आहे. माध्यमांद्वारे मिळालेली माहिती खरी असल्यास लोकांच्या भावनेला हात घालून जर विक्रांतसाठी पैसे गोळा केले असतील तर ते राजकीय पक्षाकडे का दिले?
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 13, 2022
अकरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची चर्चा - बिगर भाजपा सरकार असलेल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी असे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिले आहे. जवळपास अकरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक व्हावी याबाबत चर्चा सुरू आहे. ही बैठक मुंबईत घेण्यात यावी याबाबत देखील पडताळणी सुरू असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - Power Shortage In Maharashtra : महाराष्ट्र होणार घामाघूम.. ऐन उन्हाळ्यात कोळशाची टंचाई.. वीज निर्मिती ठप्प..