ETV Bharat / city

देशात परिवर्तन घडेल; शरद पवार

author img

By

Published : May 21, 2019, 4:52 AM IST

निवडणुकांचे निकाल लागायचे तेव्हा लागतील, मात्र सध्या जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालय गाठलं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

देशात परिवर्तन घडेल; शरद पवार

मुंबई - निवडणुकांचे निकाल लागायचे तेव्हा लागतील, मात्र सध्या जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालय गाठलं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजीत इफ्तार पार्टीत शरद पवार बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केदारनाथ मंदिरात जाणं आणि एक्झिट पोल या दोन्ही गोष्टी नाटंकं आहेत. अशी टीकाही शरद पवार यांनी यावेळी केली. आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल, हे स्पष्ट व्हायला अवघे 2 दिवस उरले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी देशात एक वेगळंच वातावरण निर्माण केलं आहे. काही प्रसारमाध्यमं सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत, असंही शरद पवार म्हणाले.

मला रविवारपासून काही फोन येत आहेत. चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मी सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका. दोन दिवसांतच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आम्ही इथे बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत तर काही पक्षांतले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. रविवारपासून नाटकं सुरू आहेत, ती बघा आणि सोडून द्या, असा सल्ला शरद पवारांनी दिला.

देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास असल्याचं पवारांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुनिल तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Intro:जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसत आहेत-शरद पवारांची मोदींवर टीकाBody:जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसत आहेत-शरद पवारांची मोदींवर टीका

मुंबई, ता. २० :

निवडणुका होतील. निकाल लागत रहातील मात्र सध्या जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालयात जाणं पसंत केलं आहे असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज इफ्तार पार्टीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केदारनाथ मंदिरात जाणं आणि एक्झिट पोल हे दोन्ही नौटंकी आहे अशीही टीका शरद पवार यांनी यावेळी केली.
आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत असंही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार मुंबईतल्या रोजा इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
एवढंच नाही तर यावेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. प्रसारमाध्यमांनी देशात एक वेगळं वातावरण निर्माण केलं आहे. काही प्रसारमाध्यमं सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत असंही शरद पवार म्हणाले.
मला रविवारपासून काही फोन येत आहेत. चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मी सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका दोन दिवसातच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.
आम्ही इथे बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत तर काही पक्षातले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. समाजातला बंधुभाव, एकता कशी टीकून राहिल? रविवारपासून नाटकं सुरू आहेत ती बघा आणि सोडून द्या असाही सल्ला शरद पवारांनी दिला.
देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास आहे त्यासाठी मी अल्लाहकडे दुवा मागणार आहे असंही शरद पवार यांनी सांगितले.
या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.Conclusion:जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसत आहेत-शरद पवारांची मोदींवर टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.