ETV Bharat / city

Presidential Election 2022 : शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत : राष्ट्रवादी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( Presidential Election 2022 ) लढवावी अशी इच्छा अनेक विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवार हे मात्र राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने ही माहिती दिली.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Jun 14, 2022, 1:35 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( Presidential Election 2022 ) लढवण्यास इच्छुक नाहीत. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, काही विरोधी पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीसाठी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. पवार यांनी सोमवारी येथे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा मुद्दा चर्चेला आला आहे.

आम आदमी पक्षाचा पाठिंबा : या बैठकीला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह ( MP Sanjay Singh ) यांनी रविवारी पवार यांची भेट घेतली आणि 18 जुलै रोजी होणाऱ्या भारताच्या पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना आम आदमी पक्षाचा पाठिंबा असल्याचे ( AAP Support Sharad Pawar For President ) सांगितले. मागील आठवड्यात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे ( Congress Leader Mallikarjun Kharge ) हे राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात मुंबईत असताना त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून पवार यांच्या नावाला पसंती दिली होती.

विरोधकांना एकत्र आणायचा प्रयत्न : पवारांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसने ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी (टीएमसी) सल्लामसलतही केली असल्याचे खरगे म्हणाले. "पण, मला वाटत नाही की ते निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. साहेब (पवार) हे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. त्यांना लोकांना भेटायला आवडते. ते स्वतःला राष्ट्रपती भवनापुरते मर्यादित ठेवणार नाहीत," असे राष्ट्रवादीचे मंत्री म्हणाले. विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात पवार व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.

एनडीएकडे ५० टक्के मतं : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा एकच उमेदवार देण्यासाठी काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA कडे ५० टक्के मतं आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार आहेत, प्रत्येकाकडे 700 मते आहेत, तर वेगवेगळ्या मतांसह राज्यांमध्ये 4,033 आमदार आहेत. जे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी देखील निवडतील.

एनडीएचे पारडे जड : मतदारांची अंतिम यादी अद्याप अधिसूचित केली गेली नसली तरी, एनडीएच्या बाजूने 440 खासदार आहेत तर विरोधी यूपीएकडे सुमारे 180 खासदार आहेत. याशिवाय टीएमसीचे 36 खासदार सामान्यतः विरोधी उमेदवाराला पाठिंबा देतात. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. ज्यात संसद आणि राज्य विधानसभांच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतील.

हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार यांचे भवितव्य काय, वाचा एका क्लिकवर सर्व लेखाजोखा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.