मुंबई - कोकण आणि परिसरात निसर्ग चक्रीवादळाने शेतकरी आणि बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने तातडीची मदत उपलब्ध करून दिली असली. तरिही त्याहून अधिक मदत देण्याची गरज असल्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान केली. निसर्ग वादळामुळे अतोनात नुकसान झालेल्या कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात शरद पवार यांनी दोन दिवस दौरा करून त्यांची पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कोकणातील शेतकरी आणि नागरिकांना अधिक मदत मिळावी अशी सूचना केली.
हेही वाचा... 'निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठे नुकसान, केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे मदत जाहीर करावी'
दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात आज दुपारी पवार आणि मुख्यमंत्री यामध्ये तब्बल तासभर बैठक झाली. या बैठकीत पवारांनी विविध प्रकारच्या आणि तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी अनेक सूचना केल्या. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'राज्य सरकारने आणखी काही निर्णय घेणे अपेक्षित आहेत. यावर बैठकीत चर्चा झाली. ज्या ज्या ठिकाणी पंचनामे अर्धवट आहेत. त्या ठिकाणी अधिक वेगाने पंचनामे व्हावेत, आणि नागरिकांना तातडीने मदत मिळावी. अशा प्रकारची सुचना शरद पवार यांनी या बैठकीत केली.'
दापोली आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळले असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरू होण्यास काही वेळ लागू शकतो. विद्युत पुरवठा सुरू व्हावा, यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. आदी अनेक विषय पवार यांनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुढे मांडले असल्याची माहिती खासदार तटकरे यांनी दिली.
-
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. pic.twitter.com/jPh00F8ECC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. pic.twitter.com/jPh00F8ECC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 11, 2020रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. pic.twitter.com/jPh00F8ECC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 11, 2020
कोकणातील चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला असून त्यासोबत शेकडो फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर अनेकांना आपले घरही वाचवता आलेले नाहीत. त्यामुळे कोकणातील सर्व नुकसानीचे पंचनामे आल्यानंतर यासंदर्भातील माहिती देण्यासाठी शरद पवार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहितीही तटकरे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिकार हा विषय देखील चर्चिला गेला असल्याचे सांगण्यात येते.