ETV Bharat / city

'काका-पुतणे हे ठग्स ऑफ ठेवीदार'

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्य शिखर बँकेच्या घोटाळाप्रकरणी शीर्ष भागात आहेत. लोन संदर्भातील समितीत अजित पवार होते असे निरीक्षण न्यायायलाने नोंदवले आहे. हे भाजप म्हणत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार यांची शरद पवार यांच्यावर टीका
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:02 PM IST

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी संबंध नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतरही भाजपकडून पवार यांना लक्ष केले जाते. राष्ट्रवादीचे काका-पुतणे हे 'ठग्स ऑफ ठेवीदार' आहे. शरद पवार यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला, नारायण राणेंचे बंड अन् राज ठाकरेंचा शिवसेनेला राम-राम

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्य शिखर बँकेच्या घोटाळाप्रकरणी शीर्ष भागात आहेत. लोन संदर्भातील समितीत अजित पवार होते असे निरीक्षण न्यायायलाने नोंदवले आहे. हे भाजप म्हणत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

राज्य शिखर बँकेच्या एकूण ठेवी 11 हजार कोटी रुपयांच्या असताना 25 हजार कोटींचा घोटाळा झाला कसा? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. याचे उत्तर न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशात आहे. बुडीत निघालेले कारखाने, नियमबाह्य कर्ज आणि बँकेला तोटा होईल, असा कारखान्यांचा खरेदी व्यवहारात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे न्यायालयाने आधीच म्हटले आहे. या संदर्भातील विविध नोंदीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकेच्या संचालक मंडळावर प्राथमिक गुन्हा नोंदवला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे कधीही या बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते. मात्र, त्यांच्या दबावात्मक भूमिकेमुळेच कर्जवाटपात घोटाळा झाला असल्याचे न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे, असे यावेळी शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा - गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली

आघाडी सरकारच्या काळातच बँकेच्या कारभारासंदर्भात तक्रारही दाखल केल्यानंतर त्याच्या चौकशीला मंजुरी दिली होती, यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. आम्ही जनतेच्या पैशांची ही लूट निवडणुकीत जनतेसमोर मांडणार आहोत, असेही शेलार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गाजणार हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका नाही-

नव्वदच्या दशकात करण्यात आलेल्या दोन खासगी तक्रारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा किंवा चौकशी करा असेही न्यायायलाने म्हटले नाही. केवळ पुन्हा आपली बाजू मांडा असे म्हटले आहे. त्यामुळे त्या प्रकरणाचा या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा - गांधी@150 : रेल्वे मंत्रालयाने दाखवले ईटीव्ही भारतचे गीत

ज्या प्रकरणांची दिवाणी सत्र न्यायायलाने दखल घेतली नाही. उच्च न्यायालयाने ही पुन्हा सत्र न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख नव्हता. आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा खालच्या न्यायालयात बाजू मांडण्यास सांगितले आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

Intro:काका- पुतणे हे "ठग्स ऑफ ठेवीदार" , शरद पवारांचा राज्य बँक घोटाळ्याशी संबंध- आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी संबंध नसल्याचा निर्वाळा दिला असला तरी भाजप कडून पवार यांना लक्ष केलं जातंय. राष्ट्रवादीचे काका -पुतणे हे ठग्स ऑफ ठेवीदार असून शरद पवार यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्य शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणी शीर्ष भागात आहेत. लोन संदर्भातील समितीत अजित पवार होते असे निरीक्षण न्यायायलाने नोंदवले आहे. हे भाजप म्हणत नाही असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
राज्य शिखर बँकेच्या एकूण ठेवी 11 हजार कोटी रुपयांच्या असताना 25 हजार कोटींचा घोटाळा झाला कसा असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्तिथ केला आहे. याचे उत्तर न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशात आहे. बुडीत निघालेले कारखाने, नियम बाह्य कर्ज आणि बँकेला तोटा होईल असा कारखान्यांचा खरेदी व्यवहारात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे न्यायालयाने आधीच म्हटले आहे. या संदर्भातीक विविध नोंदी वरून आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकेच्या संचालक मंडळावर प्राथमिक गुन्हा नोंदवला आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे कधीही या बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते. मात्र त्यांच्या दाबावात्मक भूमिकेमुळेच कर्जवाटपात घोटाळा झाला, असल्याचे न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे असे ययावेळी शेलार यांनी सांगितले.
आघाडी सरकारच्या काळातच बँकेच्या कारभारासंदर्भात तक्रारही दाखल केल्या नंतर त्याच्या चौकशीला मंजुरी दिली होती, यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गप्प का आहेत? असा सवाल ही त्यांनी केला.
आम्ही जनतेच्या पैश्याची ही लूट निवडणुकीत जाणते समोर मांडणार आहोत असेही शेलार यांनी स्पष्ट केल्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गाजणार हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका नाही-

नव्वदच्या दशकात करण्यात आलेल्या दोन खाजगी तक्रारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा किंवा चौकशी करा असे ही न्यायायलाने म्हटले नाही.केवळ पुन्हा आपली बाजू मांडा असे म्हटले आहे. त्यामुळे त्या प्रकरणाचा या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले.

ज्या प्रकरणांची दिवाणी सत्र न्यायायलाने दखल घेतली नाही. उच्च न्यायालयाने ही पुन्हा सत्र न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख नव्हता. आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा खालच्या न्यायालयात बाजू मांडण्यास सांगितले आहे, असेही शेलार यांनी सांगितले. Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.