ETV Bharat / city

Meeting on ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब, शरद पवार यांची बैठक; सदावर्तेंच्या जागी नवे वकील, पवार म्हणाले... - Gunaratna Sadavarte removed for ST employees lawyer

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असून गेले 70 दिवस राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीचे सदस्य यांची बैठक ( meeting on st workers strike mumbai ) बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतायला हवं असे आवाहन ( Sharad Pawar appeal to ST employees ) केले.

Meeting on ST Workers Strike
एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर शरद पवार यांची बैठक
author img

By

Published : Jan 10, 2022, 5:57 PM IST

Updated : Jan 10, 2022, 8:02 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन हा प्रवाशांच्या हिताचा असायला पाहिजे. गेली तीस ते चाळीस वर्षे पाहतोय. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या तेवढ्यापुरता मर्यादित असतात. पहिल्यांदाच दोन महिन्याच्या वर एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST Workers Strike ) सुरू आहे. कामगारांचे हित जपण्यासाठी जी लोक वेळ देत आहेत. प्रयत्न करत आहेत त्यांचे देखील ऐकले जात नाही. मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे मोठ्या प्रमाणात अर्थकारणावर परिणाम पडला आहे. त्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कृती समितीचे सदस्य आणि परिवहन मंत्री मिळून सकारात्मक चर्चा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतायला हवं. यासाठी खुद्द एसटी कृती समितीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले. तसेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सकारात्मक निर्णय घेण्याचं मान्य केल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

अनिल परब, शरद पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवार, अनिल परब आणि एसटी कृती समितीचे सदस्यांची बैठक ( meeting on st workers strike mumbai ) -

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असून गेले 70 दिवस राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीचे सदस्य यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ही माहिती दिली.

'...पक्षांनी संपाच्या मागून राजकारण करण्याचा प्रयत्न केला' -

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे ग्रामीण भागात प्रवाशांची अवस्था बिकट झाली आहे. प्रवाशांच्या परिस्थितीचं वर्णन न केलेलं बरं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेतली असून कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील यावर चर्चेने मार्ग काढू असं आवाहन या बैठकीनंतर शरद पवार यांनी कर्मचाऱ्यांना केल आहे. विलिनीकरण शक्य नसल्याचा राज्य सरकारने याआधीही म्हंटल आहे. मात्र विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट असल्याने या मुद्द्यावर शरद पवार यांनी बोलणे टाळले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहिलेल्या काही राजकीय पक्षांनी यामध्ये राजकारण केलं असलं तरी, सध्या हा प्रश्न मिटवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तसेच ज्या पक्षांनी संपाच्या मागून राजकारण करण्याचा प्रयत्न केला असला तरी तिच्या पक्षाची भूमिका असू शकते. मात्र आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे परिवहन मंत्र्याचे आवाहन -

अद्याप ज्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही, ते कर्मचारी कामावर परतल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. काही कर्मचारी कामावर परतण्याची तयारीत आहेत. मात्र प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल अशी भीती त्यांना दाखवली जाते. त्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ते कर्मचारीदेखील कामावर परंतु शकतील. त्यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत पुढे चर्चा करून मार्ग काढू असे संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठकीनंतर दिले आहेत. आज झालेल्या बैठकीत 22 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांबरोबर परिवहन मंत्री आणि शरद पवार यांनी चर्चा केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी ही विलिनीकरणाची आहे. मात्र विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. यासाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती देखील नेमली असून त्या समितीचा निर्णय हा राज्य सरकारला मान्य असेल असं पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर परताव्यासाठी तीन वेळा एसटी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाले. मात्र अद्याप जे कर्मचारी कामावर रुजू झाले नाही त्यांनी देखील कामावर रुजू व्हावे असे आवाहन अनिल परब यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच जी पगार वाढ एसटी महामंडळाकडून करण्यात आली, या पगारवाढीबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असून, मूळ पगारात वाढ झाल्याने ज्या कर्मचाऱ्यांना याबाबत काही शंका कुशंका आहे. त्यावर देखील येणाऱ्या काळात एसटी प्रशासन तोडगा काढणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सदावर्ते आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील नाहीत -

एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती. मात्र आता गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील नसून त्या जागी ज्येष्ठ विधिज्ञ सतिष पेंडसे यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना अध्यक्ष अजय कुमार गुजर यांनी दिली. तसेच गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात योग्यरीत्या मांडली नसल्यामुळे अद्याप पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक करणे ही आमची चूक असल्याचेही यावेळी अजय कुमार गुजर यांनी सांगितले. या बैठकीला संदीप शिंदे महाराष्ट्र राज्य कामगार एसटी संघटना अध्यक्ष, श्रीरंग बर्गे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस, मुकेश तिगोटे महाराष्ट्र एसटी वर्कर काँग्रेस इंटक सरचिटणीस, विजय मलोकार- महाराष्ट्र एसटी कर्मचारी सेना, सुनील निभ्रवणे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, यांच्यासोबत आधी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

एसटी कर्मचारी संघटनाचेही आवाहन -

या सर्व पदाधिकाऱ्यांकडून देखील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले असून एसटी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे. एसटी विलीनीकरणाचा मुद्दा हा चर्चेने सोडवता येईल. मात्र गेली दोन महिन्यांहून अधिक काळापासून एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांनी विचार करता लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आवाहन या सर्व सदस्यांनी यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

हेही वाचा - Rajnath Sing Corona Positive : रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती

Last Updated : Jan 10, 2022, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.