मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण MNS workers abused and beat woman dadar Mumbai केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली. 28 ऑगस्ट रोजी विनोद अरगिल MNS Leader Vinod Argyle यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी प्रचार मंडळासाठी मतदान ठेवण्यास प्रकाश देवी Prakash Devi beaten by MNS या महिलेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन करत मारहाण केली. या प्रकरणावर आता मनसेनेच्या शालिनी ठाकरे MNS leader Shalini Thackeray यांनी प्रतिक्रिया दिली असून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अशी चूक चुकूनही होणं हा गुन्हाच it's crime woman beaten by MNS workers असल्याचे म्हटले आहे. MNS Shalini Thackeray reaction on woman beaten
अशी चूक चुकूनही अपेक्षित नाही : यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये शालिनी ठाकरे म्हणतात की, "कामाठीपुऱ्यात काहीही घडलं असलं तरी एखाद्या महिलेला पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण करणं किंवा धक्काबुक्की करणं गैरच. त्या कृतीचं समर्थन होऊच शकत नाही. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांकडून अशी चूक चुकूनही अपेक्षित नाही. महिलांचा आदर करणं, त्यांना सन्मान देणं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संस्कृती आहे. मुंबादेवी उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांच्यावर काय कारवाई करायची, याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील."
नेमकं प्रकरण काय?
28 ऑगस्ट रोजी विनोद अरगिल यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी प्रचार मंडळासाठी मतदान ठेवण्यास प्रकाश देवी या महिलेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन करत मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक त्याला मागे ओढत असल्याच व्हायरल व्हिडिओत दिसून येत. यादरम्यान त्याचा प्रकाश देवीसोबत वाद झाला. दरम्यान, महिला पुढे गेल्यावर रागाच्या भरात त्या व्यक्तीने महिलेला थप्पड मारली आणि धक्काबुक्की केली. दरम्यान, या मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे तिघेही एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करताना दिसत आहेत.