ETV Bharat / city

मिथुन चक्रवर्तीच्या मुला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षयवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बलात्कार, फसवणूक , जबरदस्तीने गर्भपात या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार ही महिला मॉडेल असून 15 ऑक्‍टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mithun Chakraborty son
महाक्षय चक्रवर्ती
author img

By

Published : Oct 17, 2020, 10:32 AM IST

मुंबई- ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षयवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बलात्कार, फसवणूक, जबरदस्तीने गर्भपात या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार ही महिला मॉडेल असून 15 ऑक्‍टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाक्षय व पीडित मॉडेल हे एकमेकाला 2015 पासून ओळखत असून, या दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून महाक्षय ने जबरदस्तीने माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवले होते, या दरम्यान माझा गर्भपातही करण्यात आल्याची तक्रार पीडित महिला मॉडेलने पोलिसांकडे केली होती. दिल्लीतील बेगमपुरा पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात महाक्षय वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र या प्रकरणातील पीडितेने मुंबईत या संदर्भातील गुन्हा नोंदवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून न्यायालयाने मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात यावा म्हणून आदेश दिले होते. त्यानुसार ओशिवारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.