ETV Bharat / city

मध्य रेल्वेकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची निर्मिती - मध्य रेल्वे लेटेस्ट न्यूज

मध्य रेल्वेच्या पर्यावरण व गृह व्यवस्थापन विभागाने वर्ष २०२० मध्ये पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार असून जल प्रदूषन टळणार आहे.

मध्य रेल्वेकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची निर्मिती

author img

By

Published : Mar 4, 2021, 11:51 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या पर्यावरण व गृह व्यवस्थापन विभागाने वर्ष २०२० मध्ये पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार असून जल प्रदूषन टळणार आहे.

10 दशलक्ष लिटर दूषित पाणी शुद्ध

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार माटुंगा कार्यशाळामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची प्रति दिवसं क्षमता ४० लिटर आहे. पंढरपूर रेल्वे स्थानकातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता ५० लिटर, मराठवाडा कोच फॅक्टरी, लातूरच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता ७० लिटर, लातूर रेल्वे स्थानक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता १५ लिटर आणि इलेक्ट्रिक लोको कार्यशाळा, भुसावळच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता १५ लिटर आहे. या पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे आता मध्य रेल्वेची दूषित पाणी शुद्ध करण्याची क्षमता 10 दशलक्ष लिटर झाली आहे.

23 पाण्याचे प्रक्रिया प्रकल्प

मध्य रेल्वेवर आतापर्यंत एकूण 23 पाण्याचे प्रक्रिया प्रकल्प बसविण्यात आले आहेत, ज्यात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, पाण्याचे री-सायकलिंग प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. हे शुद्ध पाणी मध्य रेल्वेवर विविध कामांसाठी वापरले जाते जसे की प्लॅटफॉर्मची साफसफाई करणे, स्थानकांवरील स्टॉल्सची साफसफाई करणे, कोचिंग डेपोमध्ये गाड्यांची साफसफाई करणे, गार्डन्स आणि वनस्पतींना पाणी देणे, प्रसाधन गृहात फ्लशिंगसाठी इत्यादीसाठी वापरले जातात.

पर्यावरण शुद्ध राहण्यास मदत

वातावरणात सोडल्या जाणार्‍या घाणीचे प्रमाण या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांद्वारे कमी केले जाते. अशा प्रकारे प्रदूषण कमी केल्याने पर्यावरण अधिक शुद्ध राहण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे चांगल्या पाण्याचा वापर कमी करण्यात मदत होते. शिवाय हे जलशुध्दीकरण प्रकल्प जागतिक पाणी संकटावर शाश्वत असे अल्प आणि दीर्घकालीन समाधान असल्याचे सिद्ध झाले आहे अशी, माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.