ETV Bharat / city

राज्यातील सात आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांच्यासह एकूण सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाराज वरीष्ठ अधिकारी प्रवीण परदेशी यांची भाषा विभागात अपर मुख्य सचिव पदावर नेमणूक केली आहे.

author img

By

Published : Jun 30, 2021, 9:32 PM IST

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई - राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांच्यासह एकूण सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाराज वरीष्ठ अधिकारी प्रवीण परदेशी यांची भाषा विभागात अपर मुख्य सचिव पदावर नेमणूक केली आहे. ठाकरे सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीसंबंधी अधिकृत माहिती आज (बुधवारी) जाहीर करण्यात आली आहे.

बदल्यावरून सरकार अडचणीत

जानेवारी ते मार्च २०२१ या दरम्यान राज्य सरकारने बदल्यांचा सपाटा लावला होता. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदली प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकार चांगलेच गोत्यात आले. विरोधकांनी यावर रान उठवले. राज्य सरकारने त्यानंतर बदल्यांना काही अंशी स्थगिती दिली होती. आता सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

प्रवीण परदेशी यांची वर्णी मराठी भाषा विभागात

गेल्यावर्षी कोरोना काळात मुंबई महापालिका आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांची नगर विकास विभागाच्या अपर सचिव पदी नेमणूक केली. त्यामुळे नाराज झाल्याने रजेवर गेले होते. परदेशी हे १९८५ बॅचचे अधिकारी आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि परदेशी एकाच बॅचचे अधिकारी आहे. मात्र राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या नेमणुकीत मला डावलून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची वर्णी लावल्याचे सांगत परदेशी यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली होती. आताही मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या अपर सचिव पदी परदेशी यांची नेमणूक करून राज्य सरकारने बाजूला केल्याचे बोलल्या जात आहे.

अशा आहेत बदल्या

  • प्रवीण परदेशी यांची मुंबईत मराठी भाषा विभागाच्या अपर सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे. ते १९८५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • आयटी विभागाचे संचालक रणजीत कुमार यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. ते आयएएस २००८ बॅचचे अधिकारी आहेत.
  • उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे व्ही. पी फड २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भिवंडी-निजामपूर महापालिकेचे डॉ. पंकज अशिया २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती केली आहे.
  • गडचिरोली अहेरी येथील सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, राहुल गुप्ता यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक केली आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • गडचिरोली भामरागडचे सहायक जिल्हाधिकारी, अटपाली उपविभाग आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी मनुज जिंदल यांची जालना येथे जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी निवड केली आहे. २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • मिताली सेठी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याही २०१७ च्या आयएएस अधिकारी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.