ETV Bharat / city

Youth needs Seven hour sleep : रोज रात्री सात तासांची झोप तरूणाईसाठी आवश्यक; कारणे घ्या जाणून

यूके आणि चीनमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, मध्यम व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी रात्री सात तासांची झोप घेणे गरजेचे आहे. खूप कमी किंवा जास्त झोपेचा संबंध मानसिक त्रासाशी संबंधीत Lack of sleep causes mental problems आहे.

Seven hours sleep
सात तासांची झोप
author img

By

Published : Sep 12, 2022, 5:42 PM IST

वॉशिंग्टन ( यूएस ) - मानसिक आणि शारिरीक आरोग्य राखण्यासाठी झोप महत्त्वपूर्ण Sleep is important for mental and physical health आहे. पूर्ण झोपेमुळे मेंदू निरोगी राहण्यास मदत होते. जसजसे आपले वय वाढते आणि आपण मोठे होतो. तसतसे आपले झोपेचे प्रमाण बदलते. झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी होते. कमी झोपेमुळे मानसिक त्रास Lack of sleep causes mental problems उद्भवतात.

यूके आणि चीनमध्ये संशोधन - नेचर एजिंगमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, यूके आणि चीनमधील संशोधकांनी यूके बायोबँकमधील 38 ते 73 वयोगटातील सुमारे 5,00,000 व्यक्तींची माहिती घेतली. यात त्यांनी सहभागींच्या झोपेच्या सवयींबाबत प्रश्न विचारे माहिती घेतली. जवळपास 40,000 जणांची झोपेची सवय अत्यंत वाईट असल्याचे त्यांना निष्पण्ण झाले.

अल्झायमर होण्याचा धोका - चीनमधील फुदान युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जियानफेंग फेंग यांच्या म्हणण्यानुसार, खूप कमी किंवा जास्त झोपेमुळे संज्ञानात्मक समस्या उद्भवतात. ते निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु दीर्घ कालावधीसाठी लोकांची तपासणी या सिद्धांताची पुष्टी करते. त्याव्यतिरीक्त वयोवृद्ध व्यक्ती आणि तरुणांची झोप यात जमिन आसमाणाचा फरक जाणवतो. ही गोष्ट प्रभाव टाकणारी आहे असे समोर येते. काही संशोधकांच्या मते अपूऱ्या झोपेमुळे विविध आजार उद्भवतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. स्मृतिभ्रंश किंवाअल्झायमर रोग होण्याचा धोका अशा व्यक्तींना संभवतो.

सात तासांची झोप आवश्यक - संज्ञानात्मक कार्य, चांगले मानसिक आरोग्य आणि एकूणच आरोग्यासाठी दररोज रात्री सात तासांची झोप घेणे देखील महत्त्वाचे असते. मागील संशोधनात असे दिसून आले आहे की झोपेची अनियमित पद्धतीमुळे अपचण, जळजळ होणे, डोळ्यांखाली काळे डाग पडणे असे परिणाम जाणवतात. यात तरूणाई तर जास्त अडकतेच पण कामाचा ताण, उशीरापर्यंत काम करणे यामुळे वृद्ध व्यक्ती वृद्धत्वाशी संबंधितआजारांना बळी पडतात.

झोपेचे नियम पाळणे गरजेचे - केंब्रिज विद्यापीठाच्या मानसोपचार विभागाच्या प्रोफेसर बार्बरा सहकियान यांनी सांगितले की "जीवनाच्या सर्व टप्प्यांवर चांगली झोप घेणे आवश्यक आहे, परंतु विशेषतः वयानुसार. विशेषत: मानसिक विकार आणि स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांनी झोपेचे नियम पाळणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.