ETV Bharat / city

Ram Kadam Letter CM Thackeray : शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक उभारा, राम कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लता मंगेशकर यांचे काल निधन झाले ( Lata Mangeshkar Passes Away ) आहे. त्यांच्यावर काल शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ( Ram Kadam Letter Cm Thackeray ) आहे.

Ram Kadam Letter Cm Thackeray
Ram Kadam Letter Cm Thackeray
author img

By

Published : Feb 7, 2022, 11:20 AM IST

Updated : Feb 7, 2022, 3:15 PM IST

मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांना पंचत्वात विलीन करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे, असे पत्र भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ( Ram Kadam Letter Cm Thackeray ) लिहले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांना लिहलेल्या पत्रात राम कदम म्हणतात की, "भारतरत्न लता दीदींचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात शिवाजी मैदान ( शिवाजी पार्क ) दादर, मुंबई येथे करण्यात आले. म्हणूनच लतादीदींच्या कोट्यवधी चाहत्यांच्या, संगीतप्रेमींच्या आणि हितचिंतकांच्या वतीने माझी नम्र विनंती आहे की, दिवंगत भारतरत्न लतादीदींचे शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मारक उभारले जावे. त्यामुळे जनतेच्या या मागणीचा मान राखून हे स्मारक तात्काळ उभारावे, जेणेकरून हे ठिकाण जगाचे प्रेरणास्थान होईल, ही विनंती."

  • Maharashtra BJP MLA Ram Kadam writes to CM Uddhav Thackeray, requesting a memorial of veteran singer #LataMangeshkar, at Shivaji Park in Mumbai. She was cremated at the park yesterday with full state honours. pic.twitter.com/xkMDIVsJy7

    — ANI (@ANI) February 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लतादीदींच्या करोडो चाहत्यांची इच्छा

राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या पत्रातून लतादीदींच्या करोडो चाहत्यांच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही फक्त राम कदम यांचीच नाही तर त्यांचे करोडो चाहते आहेत, या सर्वांची हीच इच्छा असणार आहे. म्हणून त्याने स्मारक शिवाजी पार्क येथेच उभारावे, असेही त्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - Video : समुद्र, पर्वत, झाडे-वेली याप्रमाणे दीदींचा स्वरही अजरामर

Last Updated : Feb 7, 2022, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.