मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना दिल्लीतील पीएसीएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज करुन परवानगी मागितली होती. त्या अर्जाला आज मंगळवार (दि. 26 जुलै)रोजी सत्र न्यायालयाने काही अटीवर मंजुरी दिली आहे. ( PACL financial misappropriation case ) त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रवीण राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात मुंबई ईडीने यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईडीला प्रतीक्षा करावी लागणार - मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशपांडे यांनी म्हटले आहे की, प्रवीण राऊत यांना दिल्लीला नेण्यापूर्वी चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील कारागृहामध्ये परत पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी हमीपत्र सादर केल्यानंतर त्याला अटक करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच, पत्रा चाळ प्रकरणी राऊतच्या जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईडीला प्रतीक्षा करावी लागणार आहे. असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे.
विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून 49,100 कोटी गोळा केले - ईडीने शनिवारी विशेष पीएमएलए न्यायालयात राऊतला दिल्लीला नेण्याची परवानगी मागितली. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने कपिल वाधवन आणि त्याचा भाऊ धीरज यांना कोणतीही सूचना आणि मंजुरी न देता थेट तुरुंगातून लखनौला कसे नेले याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्यामुळे ईडीकडे हमीपत्र मागवण्यात आले. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रवर्तक वाधवांची सीबीआयने दिल्लीत नोंदवलेल्या कर्ज चुकती प्रकरणात चौकशी केली. दरम्यान, ईडीने सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला आहे. ज्यामध्ये दावा केला होता की, पीएसीएलने शेतजमिनीच्या विक्री आणि विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून 49,100 कोटी गोळा केले होते.
युनिकॉर्नमध्ये गुंतवण्यात आली - 'DDPL'ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि युनिकॉर्न इन्फ्राप्रोजेक्ट्स अँड इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 94.61 कोटी गुंतवणूक करणाऱ्या प्रतीक कुमारला (PACL ने 2,285.79)कोटी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. (PACL)ने देखील 110.95 कोटी त्यांच्या 25 आघाडीच्या कंपन्यांद्वारे (Systematix Venture Capital Trust)ला हस्तांतरित केले. ही रक्कम पुन्हा डीडीपीएल आणि युनिकॉर्नमध्ये गुंतवण्यात आली असेही ईडीने म्हटले आहे.
दोन्ही कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला - या निधीचा वापर करून डीडीपीएल आणि युनिकॉर्नने महाराष्ट्रात जमीन खरेदी केल्याचा आरोपही ईडीने केला आहे. त्यांनी फ्लोअर स्पेस इंडेक्सच्या विक्रीसाठी आणि निवासी सह व्यावसायिक प्रकल्पांच्या बांधकामासाठी अनेक संस्थांसोबत करार केले, ज्यातून दोन्ही कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला आहे.
10 लाख चौरस फूट एफएसआय हस्तांतरित करणार होते - डीडीपीएल आणि युनिकॉर्नने राऊतला प्रकल्पांसाठी बोर्डात घेतले होते. असे, ईडीने सांगितले. डीडीपीएल आणि युनिकॉर्न प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राऊत यांनी खरेदी केलेल्या जमिनीपैकी 10 लाख चौरस फूट एफएसआय हस्तांतरित करणार होते, असे तपासात समोर आले आहे. हे एफएसआय हस्तांतरण मूळ जमीन मालक आणि ताबा धारक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी जमीन संपादीत करण्यासाठी बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी स्थानिक कंत्राटदार आणि एजंटांना हाताळण्यासाठी आणि मंजूरी मिळवण्यासाठी बदलण्यात आले होते.
काय आहे पत्राचाळ घोटाळा? - मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
अलिबागमध्ये जमीन खरेदी - ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.