ETV Bharat / city

Mumbai Crime : 'वडिलांसोबत विद्यार्थ्यालाही सामंजस्याच्या कागदावर सह्या करण्यास भाग पाडले'; देवनार पोलिसांवर खळबळजनक आरोप - brutal beating

Mumbai Crime : व्यंकटेश सुब्रमण्यम यांच्यावर एमएमआरडीए कॉलनीतील काही लोकांनी हल्ला केला. आधी त्यांना मारहाण करण्यात आली होती. नंतर त्यांच्या १८ वर्षांच्या मुलाला, जो बचावासाठी आला. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीलाही बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Aug 6, 2022, 8:50 AM IST

मुंबई - विद्यार्थ्याला हतकड्या घालून वडिलांसोबत सामंजस्याच्या कागदावर सह्या करण्यास भाग पाडले, असल्याचा खळबळजनक आरोप देवनार पोलिसांवर लावण्यात आला आहे. हे प्रकरण ३० जुलै २०२२ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडले आहे. व्यंकटेश सुब्रमण्यम यांच्यावर एमएमआरडीए कॉलनीतील काही लोकांनी हल्ला केला. आधी त्यांना मारहाण करण्यात आली होती. नंतर त्यांच्या १८ वर्षांच्या मुलाला, जो बचावासाठी आला. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीलाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्यंकटेश यांनी अनेकवेळा पोलीस नियंत्रण कक्षाला १०० नंबर डायल केला, पण खेदाने फक्त आश्वासन मिळाले. पंरतु, पोलिसांची मदत काही पोहोचली नाही.

Mumbai Crime

दरम्यान व्यंकटेशवर विष्णू नावाच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केले आहे. व्यंकटेशवर त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शरीरावर जखमाही झाल्या आहेत. तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. या हल्ल्याचा सगळा प्रकार जवळच्या चामुंडा मेडिकलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. नंतर व्यंकटेशला रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळाने व्यंकटेश तो त्याच्या कुटुंबासह तक्रार करण्यासाठी देवनार पोलीस स्टेशनला पोहोचला. पंरतु, देवनार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने पिडीत व्यंकटेशवर त्याचा मुलगा आणि पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. व्यंकटेशचा मुलगा सर्वेश हा बारावीचा विद्यार्थी आहे. व्यंकटेशच्या हातात बेड्या घालून पोलिसांनी देवनार पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.

तसेच पोलीस ठाण्यातून पत्र पाठवून व्यंकटेशच्या मुलाचा कॉलेजमध्ये प्रवेश होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यावर पिडीत व्यंकटेश यांनी हात जोडून पोलिसांनी हे करू नये, अशी विनंती केली. मुलाचे भवितव्य वाचवण्यासाठी व्यंकटेश यांच्याशी बराच वाद झाल्यानंतर समेटाच्या कागदावर सही करावी लागेल, या अटीवर मुलाला सोडण्यात आले आहे. व्यंकटेश आपल्या कुटुंबासह घरी पोहोचला, व्यंकटेश यांनी पोलिसांच्या या अमानुष वागणुकीची लेखी तक्रार 2 दिवसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दिली, पण कारवाई झालीच नाही. उलट या अधिकाऱ्याने व्यंकटेशला पुन्हा धमकावले. हल्ला करणाऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, सीसीटीव्ही पाहिल्यावर प्रकरण किती गंभीर आहे. हे दिसून येत आहे. डझनभर लोक एकाचवेळी व्यंकटेशला मारहाण करताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांचा असा अमानुष चेहरा पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. जिथे तक्रार करूनही गुन्हा नोंदवण्याची धमकी देऊन सोडवणूक केली जात आहे.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : बजरंग पुनियाची गोल्डन कामगिरी; कुस्तीत मिळवले सुवर्ण पदक

हेही वाचा - Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील आठवड्यात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.