ETV Bharat / city

Bhima Koregaon violence case ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा - Bhima Koregaon violence case

वरवरा राव यांना गंभीर आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन कालावधी वाढवून देऊ नये, अशी मागणीही एनआयएच्यावतीने करण्यात आली. मात्र, त्यांची मागणी फेटाळून लावत राव यांना 29 नोव्हेंबरला नानावटी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने दिली.

Senior Telugu poet Varvara Rao
ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव
author img

By

Published : Nov 18, 2021, 10:18 PM IST

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि अंतरिम जामीनावर असलेल्या (८२) वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव (Senior Telugu poet Varvara Rao) यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा (Senior Telugu poet Varvara Rao) दिला आहे. वरवरा राव यांना २ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याची गरज नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खंडपीठाने वरवरा राव यांना 29 नोव्हेंबर रोजी नानावटी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पुण्यात ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेचा भीमा कोरोगाव प्रकरणी (Bhima Koregaon violence case) संबंध जोडत पोलिसांनी कवी वरवरा राव यांना 2018 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून राव तळोजा कारागृहात होते. त्यातच वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सशर्त जामीन मंजूर केला. तसेच अंतरिम जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वी त्यांना शरणागती पत्कारण्याचे निर्देश दिले. ही मुदत संपल्याने राव यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर व वकील आर. सत्यनारायनन यांनी मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला.

हेही वाचा-प्रत्यक्ष हजेरी न लावण्यासंदर्भात वरवरा राव यांचा विशेष एनआयए कोर्टात अर्ज

वरवरा राव यांच्या अर्जावर न्यायाधीश नितीन जामदार आणि न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एनआयएच्यावतीने राव यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करण्यात आला. राव यांना गंभीर आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन कालावधी वाढवून देऊ नये, अशी मागणीही एनआयएच्यावतीने करण्यात आली. मात्र, त्यांची मागणी फेटाळून लावत राव यांना 29 नोव्हेंबरला नानावटी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत (Mumbai High Court on Bhima Koregaon violence case) न्यायालयाने दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुनावणी 2 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

हेही वाचा-वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

  • कोण आहेत वरवरा राव?

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या दरम्यान अनेक वाहनेही जाळली गेली. वरवरा राव हे तेलुगू डाव्या विचारसरणीचे कवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या क्रांतीकारक कवितांसाठी ओळखले जातात. ते तेलुगू साहित्याचे प्रख्यात मार्क्सवादी समिक्षक मानले जातात. राव अनेक दशकांपासून अनेक विद्यार्थ्यांना या विषयावर शिकवत आहेत. राव हे वीरसमचे (क्रांतिकारक लेखक संघटना) संस्थापक सदस्यदेखील आहेत.

हेही वाचा-शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी वरवरा राव यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.