ETV Bharat / city

मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी; पुढील ९ दिवस कलम १४४ लागू - मुंबई लाईव्ह अपडेट

मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील ९ दिवस सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जाण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून असा आदेश जारी करण्यात आला आहे.

Section 144 applies on the background of Ganeshotsav in Mumbai
मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 9 दिवस जमावबंदी
author img

By

Published : Sep 9, 2021, 5:32 PM IST

Updated : Sep 9, 2021, 10:59 PM IST

मुंबई - मुंबईत गणेशोत्सव काळात जमावबंदी आदेश लागू केला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील ९ दिवस सार्वजनिक ठिकाणी ५पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जाण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून असा आदेश जारी करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध -

गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी मिळणार नाही. तसेच राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास

Last Updated : Sep 9, 2021, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.