ETV Bharat / city

एक कोटी लसींच्या ग्लोबल टेंडरसाठी महापालिकेकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ, ८ पुरवठादारांचा प्रतिसाद - ग्लोबल टेंडर कोरोना लस

मुंबई महापालिकेने लस विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागतिक स्थरावरील कंपन्याकडून स्वारस्य असल्याचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत ८ पुरवठादारांनी या प्रस्तावाना प्रतिसाद दिला आहे. यासाठी पालिकेने १८ मे व आज २५ मे अशा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

global tender of one crore vaccines
global tender of one crore vaccines
author img

By

Published : May 25, 2021, 7:56 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने लस विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागतिक स्थरावरील कंपन्याकडून स्वारस्य असल्याचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत ८ पुरवठादारांनी या प्रस्तावाना प्रतिसाद दिला आहे. यासाठी पालिकेने १८ मे व आज २५ मे अशा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

ग्लोबल टेंडरची मुदत दुसऱ्यांदा वाढवली -

मुंबईला ज्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे, त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने नागरिकांना लस मिळताना अडचणी येत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने एक कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने १२ मे ला १ कोटी लसींचा पुरवठा करण्यासाठी जागतिक स्थरावरील कंपन्यांकडून स्वारस्य प्रस्ताव मागवले होते. १८ मे ला त्याला पहिल्यांदा तर आज २५ मे ला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

आठ पुरवठादार आले पुढे -

एक कोटी कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी १८ मे ला महापालिकेकडे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावयाचे होते. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता हे प्रस्ताव उघडण्यात येणार होते. जर महानगरपालिकेने कार्यादेश दिला, तर तीन आठवड्यांच्या आत संपूर्ण लससाठा संबंधित कंपन्यांना पुरवावा लागेल, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने स्वारस्य कळवण्यासाठी एका आठवड्याची म्हणजेच २५ मेपर्यंत मुदत वाढ दिली होती. आतापर्यंत महापालिकेकडे ८ पुरवठादारांनी स्वारस्य दाखवले आहे. ७ पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर उर्वरित एका पुरवठादाराने अस्ट्राझेनका फाईजर या लसीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखविले आहे.

पालिकेचा बारकाईने अभ्यास -

लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोहोंदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती याचा बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन पाठपुरावा करीत आहे. काल २४ मे रोजी एका संभाव्य पुरवठादाराबरोबर महानगरपालिका प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यानंतर आज २५ मे रोजी सकाळी ४ संभाव्य पुरवठादारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली.

लसींचा तुटवडा -

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. १६ जानेवारीपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. आतापर्यंत २८ लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. दररोज ३० ते ५० हजार लसीकरण केले जात आहे. लसीचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ३० लाख इतकी असून प्रत्येकी दोन डोस द्यावे लागणार आहे. त्या प्रमाणात लसीची आवश्यकता भासणार आहे.

या अटी-शर्थींची पूर्तता करणे बंधनकारक -

  • १ - पुरवठादार कंपनीला लसीचा यूएसस्थित 'एफडीए' समकक्ष प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी
    २ - 'आयसीएमआर', 'डीसीजीआय'च्या निकषांची पूर्तता करणारी असावी
    ३ - कार्यादेश मिळाल्यानंतर तीन आठवड्यात पुरवठा सुरू करावा
    ४ - पालिकेची २० रुग्णालये आणि २४० केंद्रांवर लस सुरक्षितरीत्या पोहचवण्याची व्यवस्था असावी
    ५ - लसींचा पुरवठा सुरू झाल्यानंतर अचानक पुरवठा खंडित केल्यास दंडात्मक कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.