मुंबई - सर्वसामान्य लोकांवर आता महागाईचा बोजा वाढणार आहे. बहुतांश एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती पुन्हा १०-१५% पर्यंत वाढवण्याच्या विचारात ( FMCG price hike ) आहेत. गहू, पाम तेल आणि पॅकेजिंग सामग्रीच्या महागाईमुळे कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ होत ( FMCG Companies Plan to Hike Prices ) आहे. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धामुळेही कंपन्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
एफएमसीजी वस्तूंच्या किमती महागणार -
युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. डाबर आणि पारले यासारख्या कंपन्या महागाई कमी करण्यासाठी किमतीत किरकोळ वाढ करतील. एफएमसीजी कंपन्यांनी फेब्रुवारीत साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, शाम्पू, चहा, कॉफी, बिस्कीट, नूडल्स आणि ज्यूससारख्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. या कंपन्यांनी कमोडिटीच्या किमतीतील वाढीचे ओझे ग्राहकांवर टाकले आहे.
10-15 टक्के किमतीत वाढ होण्याची शक्यता -
एफएमसीजी उद्योगाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहिती, गेल्या वेळी कंपन्यांनी पूर्णपणे कमोडिटी भाववाढ ग्राहकांवर टाकली नव्हती. तेव्हा कोविडनंतर मागणी वाढली होती हे त्यामागचे कारण आहे. आता सर्व कंपन्या १०-१५ टक्के किंमत वाढवत आहेत. नुकतेच ब्रेंट क्रूडचे दर १३९.१३ डॉलर प्रतिबॅरल होऊन सुमारे १३ वर्षे ८ महिन्यांच्या उच्च पातळीवर पोहोचले होते. आता यात घट होऊन १०० डॉलर प्रतिबॅरलखाली आले आहेत.
हेही वाचा - महागाईचा भडका : चहा आणि कॉफीच्या किंमतीत 2 ते 5 रुपयांची वाढ