ETV Bharat / city

Mumbai Crime : शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या सुरक्षा रक्षकाला अटक, शौचालयात करायचा अत्याचार - Mumbai Crime

15 वर्षीय मुलीचा पाठलाग आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ( minor girl sexually assaulting in gamdevi ) शाळेच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे.

File photo
File photo
author img

By

Published : Sep 11, 2022, 4:48 PM IST

Updated : Sep 11, 2022, 6:09 PM IST

मुंबई - 15 वर्षीय मुलीचा पाठलाग आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ( School security guard arrested for sexually assaulting ) शाळेच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तिचा पाठलाग करायचा, शाळेत एकटी दिसल्यावर तिला अयोग्य स्पर्श करायचा आणि व्हिडिओ कॉल करायचा. संबंधित आरोपींवर कलमान्वे गमदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आधी तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. तो तिला शाळेच्या शौचालयात घेऊन जायचा आणि तिथे तिच्यावर अत्याचार करायचा. मुलीला आरोपीने हे कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. अलीकडेच तिच्या आईला ती रडताना दिसली. तिला काहीतरी शंका आली आणि तिने आपल्या मुलीला विश्वासात घेतले. तेव्हाच मुलीने तिचा त्रास सांगितला. त्यानंतर तिच्या आईने शाळा प्रशासनाला माहिती दिली आणि पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली.


आरोपीला 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घटनेची माहिती मिळताच आम्ही आरोपीला ( School security guard arrested Gamdevi ) अटक केली, त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 14 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, असे गावदेवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता ( IPC ) कलम 354, 354 Aसह कलम 354 डी, पॉक्सो कलम १२ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तिचा नंबरदेखील घेतला होता. तिला व्हिडीओ कॉल केला होता. तिला मोबाईल समोर कपडे उतरवण्यास सांगितले होते. तो असे वारंवार करायचा. त्याआधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा 67 ए कलमाचा समावेश केला आहे. आरोपीने अशाच प्रकारे शाळेतील अन्य मुलीवर अत्याचार केले होते का, याचा तपास आता पोलीस करत ( minor girl sexually assaulting Gamdevi mumbai ) आहेत.

Last Updated : Sep 11, 2022, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.