मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग ( EX CP Param Bir Singh ) यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी दाखल केलेले 5 फौजदारी गुन्हे ( Mumbai Police Case Parambir Singh ) निष्पक्ष तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना एका दिले ( SC Transferred Parambir Sing Cases CBI ) आहेत. सर्व अधिकाऱ्यांना सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यापुढे पुढील एफआयआर दाखल करायची असल्यास ती सीबीआयकडे हस्तांतरित केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
निलंबन मागे नाही : परमबीर सिंग यांचे निलंबन मागे घेत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. परमवीर सिंग यांच्यावरील खंडणी प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परमविर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे दिलासाच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. परमवीर सिंह यांच्यावरील दाखल 5 खंडणी प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस कौल यांनी हा निर्णय सुनावलं आहे. मुंबईत वेगवेगळ्या तक्रारदारांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. सध्या ह्या पाचही प्रकरणात मुंबई पोलिस तपास करत होते.