ETV Bharat / city

Save ST Action Committee Agitation : एसटी संपकऱ्यांच्या विरोधात आता नागरिकांचे आंदोलन - एसटी कर्मचारी आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ( ST Worker Strike ) राज्यातील गोरगरीब कष्टकरी जनता व विद्यार्थी यांची प्रचंड ( People Suffer Due To ST Worker Strike ) आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे १० मार्च रोजी विधीमंडळासमोर एसटी वाचवा-एसटी वाढवा कृती समितीतर्फे ( Save ST Action Committee ) धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.

Save ST Action Committee Agitation
Save ST Action Committee Agitation
author img

By

Published : Mar 8, 2022, 7:04 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ( ST Worker Strike ) राज्यातील गोरगरीब कष्टकरी जनता व विद्यार्थी यांची प्रचंड ( People Suffer Due To ST Worker Strike ) आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे संपकर्त्यांनी तूर्त संप स्थगित करुन एसटी बसेस सुरु कराव्यात व सरकारनेही सर्व मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, या मागणीसाठी १० मार्च रोजी विधीमंडळासमोर एसटी वाचवा-एसटी वाढवा कृती समितीतर्फे ( Save ST Action Committee ) धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी आंदोलन -

एसटीच्या संपामुळे मुख्यतः राज्यांतील मुलींच्या शिक्षणावर गदा आली आहे. ग्रामीण भागांतील मुलींचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी, धरणे आंदोलन केले जात आहे. एसटी कामगारांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, एसटी ही राज्यांतील जनतेची जीवन वाहिनी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण वाहिनी आहे. याचा विसर कामगार व सरकार दोघांनाही पडता कामा नये, असेही पत्रकात नमूद केले आहे. एसटी संपकऱ्यांनी काही मूठभर राजकारण्यांचे दुष्ट हेतुला बळी पडू नये. त्याचबरोबर एसटी कामगारांचे प्रश्न लोकांच्या पाठिंब्याशिवाय सुटू शकणार नाहीत आणि आजतरी या संपास लोकांची सहानुभूती राहिलेली नाही, हे संबंधितांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. १३ महीने ताकदीने चालविलेले शेतकरी आंदोलनही काही मागण्या मान्य झाल्यावर स्थगित करण्यात आले व प्रलंबीत मागण्यांसाठी मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे.

संप स्थगित करण्याचे आवाहन -

या पार्श्वभूमीवर सरकारने देऊ केलेले लाभ पदरात घेऊन सामान्य जनता व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी संप स्थगित करण्याचे आवाहन एसटी वाचवा-एसटी वाढवा कृती समिती, महाराष्ट्रचे निमंत्रक नितीन पवार, धनाजी गुरव, सुभाष लोमटे, प्रभाकर नारकर, यांनी केले आहे. त्याचबरोबर सरकारनेही सहानुभूती दाखवत संपकर्त्यांवर कारवाई न करता, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा. या आधी जाहीर केलेले पगारवाढीसह अन्य लाभ लागू करावे, एसटीच्या खासगीकरणाचा दुरान्वयेही विचार करू नये, संपामुळे कारवाई झालेल्या सर्वांना सन्मानाने कामावर रुजू करुन घ्यावे, आंदोलनात जे प्राणास मुकले, त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई व एसटीमध्ये एकाला नोकरी द्यावी, आदी मागण्यांसाठी १० मार्च रोजी विधीमंडळासमोरील जनता दल पक्षाच्या कार्यालयात धरणे होणार आहेत.

हेही वाचा - International Flights resume: आंतरराष्ट्रीय उड्डाणे 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.