मुंबई : प्रसिद्ध गीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी निधन ( Pandit Shivkumar Saharma ) झाले. ते उत्तम गायकही होते. संतूरला जगभरात लोकप्रिय बनवण्याचे श्रेय शर्मा यांनाच जाते. पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
जम्मूमध्ये झाला जन्म
जम्मूमध्ये जन्मलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या तेराव्या वर्षी संतूर शिकायला सुरुवात केली. 1955 मध्ये मुंबईत त्यांचा पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स होता. खरं तर पंडित शिवकुमार शर्मा यांना संतूर लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते.
शिव हरिं यांची हिट जोडी
पंडित शिवकुमार शर्मा यांनी 1956 मध्ये आलेल्या झनक झनक पायल बाजे चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत तयार केले होते. चार वर्षांनंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्यांचा पहिला एकल अल्बम रेकॉर्ड केला. बॉलिवूडमध्ये 'शिव-हरी' (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) या जोडीने अनेक हिट गाण्यांना संगीत दिले. श्रीदेवीवर चित्रित झालेल्या 'मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ' या गाण्याचे संगीत या हिट जोडीने दिले होते.
‘द मॅन अॅण्ड हिज म्युझिक’
पं. शर्मा यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सचित्र आढावा ‘द मॅन अॅण्ड हिज म्युझिक’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘द मॅन अॅण्ड हिज म्युझिक’ हे पुस्तक इना पुरी यांना लिहिले असून नियोगी बुक्सतर्फे त्याचे प्रकाशन होणार आहे. पुस्तकात पं. शर्मा यांची मुलाखत, त्यांच्यावर अन्य मंडळींनी लिहिलेले लेख, दुर्मिळ छायाचित्रे, पं. शर्मा यांनी संगीत दिलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी इ. माहिती आहे.
हेही वाचा - पंडित शिवकुमार शर्मा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
संतूरच्या प्रेमापोटी नाकारली चित्रपटाची ऑफर
शर्मा यांचे संतूरवर एवढे प्रेम होते की, त्यासाठी त्यांनी अनेक हिट चित्रपटाची ऑफर नाकारली. एका मुलाखतीत त्यांनी याबाबात खुलासा केला होता. चित्रपटाच्या गाण्यासाठीची रंगीत तालीम सुरू असताना संगीतकार जयदेव आणि दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास मला भेटले. मला वाटले की, चित्रपटातील प्रसंग/गाणे याविषयी त्यांना काही सांगायचे असेल, म्हणून मी त्यांच्यापाशी गेलो. ते म्हणाले, ‘सात हिंदुस्थानी’ नावाचा एक चित्रपट मी करतो आहे. चित्रपटातील एका भूमिकेसाठी मला तू योग्य वाटतोस. तू ही भूमिका कर. मात्र, ‘अभिनय’हा माझा प्रांत नाही, असे अब्बास यांना सांगून त्यांनी दिलेला प्रस्ताव मी नम्रपणे नाकारला. खरे तर मी तेव्हा मुंबईत नवीनच होतो. माझे नावही झालेले नव्हते. त्यामुळे ‘करून पाहू या’ असे मनाशी ठरवले असते तर ते करायची संधी होती.
कलाकारांच्या प्रतिक्रिया
निर्माती आणि अभिनेत्री दुर्गा जसराज यांनी या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त करत निसर्गाचे संगीत नि:शब्द झाल्याचे सांगितले. बापूजी पंडित जसराजजींनंतर आता शिव चाचाजींचे अचानक जाणे हा माझ्यासाठी दुहेरी आणि सर्व काही भंगार करणारा क्षण आहे, असे त्या म्हणाल्या.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
पंडित शिवकुमार शर्मा यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार (Sangeet Akadami award), 1991 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 मध्ये त्यांना युनायटेड स्टेट्स ऑफ बाल्टिमोरचे मानद नागरिकत्वही बहाल करण्यात आले.
हेही वाचा - Haryana : हडप्पा काळातील 50 सांगाडे सापडले! 7 हजार वर्षे जुन्या शहराचे रहस्य