ETV Bharat / city

Sanjay Raut Arrest : संजय राऊत प्रकरणावर पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू - Sanjay Raut Arrest

आज सकाळी 9:30 वाजता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut medical check up ) यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची ( Sanjay Raut PMLA court ) सूत्रांनी माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Aug 1, 2022, 8:04 AM IST

Updated : Aug 1, 2022, 3:01 PM IST

मुंबई - पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी सेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांनी नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात सांयकाळी नेले. तेथेही तब्बल सहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ही अटक 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री झाली.

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सत्र न्यायालयात आणण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्या रिमांड अर्जावर होणार सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ईडीचे वकील दाखल झाले आहेत. सत्र न्यायालयाला चारही दिशेने पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून न्यायालयात केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे.

रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत घरी चौकशी- पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. रविवारी सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ईडी वतीने संजय राऊत यांना त्यांच्या घरीच नऊ तास सतत विचारपूस केली चौकशी केली. त्यानंतर मुंबईच्या येडी कार्यालयामध्ये संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी नेण्यात आले. या वेळेला शिवसेनेकांनी प्रचंड विरोधदेखील केला. त्याचवेळी संजय राऊत यांच्या घरातील सदस्य कासावीस झालेले दिसून आले.

घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त-खासदार संजय राऊत यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर आता जी ताजी माहिती येते त्यानुसार खासदार संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? - पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

हेही वाचा-CM Eknath Shinde Announced : राज्यात लवकरच साडेसात हजार पोलीस पदांची भरती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

हेही वाचा-Sanjay Raut Action Video : संजय राऊतांचे शक्तिप्रदर्शन; ईडी कार्यालयात पोहचताच गेले टेरेसवर; पाहा व्हिडिओ

हेही वाचा-Case Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Aug 1, 2022, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.