ETV Bharat / city

Sanjay Raut Slammed Eknath Group : धमक असेल तर राजीनामे द्या, निवडणुकीला सामोरे जा- संजय राऊत - संजय राऊत न्यूज

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव आहे. गुवाहाटीत काय, चौपाटीत या, येथेपण मजा करा, असा खोचकवजा सल्ला संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 26, 2022, 10:13 AM IST

Updated : Jun 26, 2022, 11:43 AM IST

मुंबई- तुमच्यात धमक असेल तर राजीनामे द्या, असे आव्हान खासदार संजय राऊत ( Sanjay Ruat slammed rebel of Shivsena MLAs ) यांनी बंडखोर आमदारांना खुले आव्हान दिले आहे. गुवाहाटीत बसून एकनिष्ठतेचे धडे देत आहेत. आसाममध्ये पूर आला आहे. मुडदे तरंगत आहेत. हॉटेलमध्ये बसून आमदार पार्ट्या करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ( Sanjay Raut Latest news ) शिंदे गटावर केली.

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचलाय. आपल्या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे सर्व प्रयत्न सध्या शिवसेना करताना दिसते. त्यासाठी सोळा आमदारांना निलंबनाची कारवाई करण्याची तयारी देखील शिवसेनेने दाखवले. या दबावाला शिंदे गटाचे सर्व बंडखोर आमदार बळी पडतात की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, या बंडखोरांना आजही थेट आव्हान संजय राऊत यांनी दिल आहे. ते आज मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव आहे. गुवाहाटीत काय, चौपाटीत या, येथेपण मजा करा, असा खोचकवजा सल्ला संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. शिवसेनेचे खरे भक्त बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत. शक्ती प्रदर्शन करतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बंडखोरांनामध्येसुद्धा बंडखोरी होऊ शकते. तुमच्या बापाच्या नावावर ती पार्टी बनवा. मग, मत मागा, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी दहा वेळा बाप बदलला. बाप बदलण्याची प्रक्रिया आमच्या पार्टीत चालत नाही.

धमक असेल तर राजीनामे द्या

निवडणुकीला सामोरे जा-खरी शिवसेना खोटी शिवसेना कशाला बुमरॅंग करता? आता जनता ठरवेल. तुम्ही राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे जा. आम्ही नारायण राणे यांना मानतो. ते राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे गेले बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मराठी माणसाचे शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. बंडखोरांसाठी दरवाजे खिडक्या सगळं काही उघड आहे. ते येतील याची खात्री आहे. आमदारांना डांबून ठेवले आहे. गुवाहाटीच्या मुख्यमंत्र्यांना आणि पर्यटन मंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, आम्हाला तिकडे 40 रूम हवे आहेत. पर्यटनाविषयी कार्यक्रम करायचा आहे. पण अद्याप उत्तर आलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "हे जे ढुंगणाला पाय लावून पळालेत, ते कट्टर शिवसैनिक होऊ शकत नाहीत. कारण, शिवसेनेचे खरे भक्त बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत. हे सगळे बंडखोर तिकडे गुवाहाटीत शक्ती प्रदर्शन करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी मुंबईत याव आणि मुंबईत शक्तिप्रदर्शन करावं जे काय व्हायचं ते मुंबईत होईल, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

राऊतांच बंडखोरांना ओपन चॅलेंज- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "काही आमदारांशी आता पाच मिनिटांपूर्वी माझं बोलणं झालं. त्यांनी इथे यायची इच्छा व्यक्त केली आहे. जबरदस्तीने आमदारांना डांबून ठेवले आहे. किती दिवस ते गुवाहाटीला राहनार जबरदस्तीने आमदारांना डांबून ठेवले आहे किती दिवस ते गुवाहाटीला राहतील. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर राजीनामा द्या 54 च्या 54 राजीनामे द्या आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढविण्याची ही हिम्मत दाखवा. ओपन चॅलेंज आहे."

बंडखोरांनीमध्ये सुद्धा बंडखोरी- "ज्यांना यायची इच्छा आहे ज्यांना जबरदस्तीने कोंडून ठेवले आहे. ते आमचेच आहेत. ते सतत आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला विश्वास आहे जे आमच्या आहेत त्या नक्की परत येतील आणि हे तुम्हाला फ्लोअर टेस्टला नक्की दिसेल. कारण, बंडखोरांमध्ये सुद्धा बंडखोरी होऊ शकते."

मागच्या अडीच वर्ष मलाईदार खाती सांभाळली - शिंदे गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवते या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की, "मागची अडीच वर्ष यांनी मलाईदार खात्यांचा कार्यभार सांभाळला. समृद्ध रस्त्यासोबत हेसुद्धा समृद्ध झाले. या अडीच वर्षे त्यांना हे सर्व दिसले नाही का ? तेव्हा आठवलं नाही ? एकनाथ शिंदे यांना खाण्यात अफू गांजा देतात काय माहित नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

ट्विट करूनही संजय राऊत यांची टीका-खासदार संजय राऊत यांचा ट्विटर करून शिवसेना बंडखोरांवर निशाणा ( Sanjay Raut tweet ) साधला आहे. किती दिवस गुवाहाटीत राहणार आहात, महाराष्ट्रात यावे लागेलच, असे त्यांनी ट्विटमध्ये सूचित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ ( Narahari Zirwal lateste news ) यांचा ऐटबाज असलेला फोटो टाकत बंडखोरांना डिवचले आहे. बंडखोरांनी हॉटेल बुकिंगचे आणखी काही दिवस वाढवल्याने राऊत यांनी त्यांना लक्ष्य केले.

हेही वाचा-शिवसेना बंडखोरांबाबत कठोर भूमिका; वाचा, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी

हेही वाचा-आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानावर दगडफेक

हेही वाचा-Rebel Shivsena MLA : साहेब मध्यस्थी करा..बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांची चंद्रकांत खैरेंना फोनवरून विनंती

Last Updated : Jun 26, 2022, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.