मुंबई - शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना होत आला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत विविध नियुक्त्या करत आहेत. वरिष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. यासर्व विषयांवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ( Sanjay Raut on cabinet ) टीकास्त्र सोडले आहे.
वरिष्ठांचे आशिर्वाद घेणे ही परंपरा- संजय राऊत म्हणाले की,लीलाधर डाके, मनोहर जोशी अनेक कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यासोबत ( Leeladhar Dake meeting ) उभे राहिले आहेत. डाके व जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटत असतील तर स्वागतच केले जाईल. ती आपली परंपरा आहे. असे संजय राऊत म्हणाले.
स्वतःचा पक्ष काढा व नियुक्त्या करा?- सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( new appointments in Shivsena ) त्यांच्या पक्षात अनेक नियुक्त्या करत आहेत. वेगवेगळी पद कार्यकर्त्यांना व नेत्यांना दिली जात आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त करत आहेत. त्यांना काय अधिकार आहे? हा सर्व पोरखेळ चालू आहे. आम्ही याला गांभीर्याने घेत नाही. यांचा संबंध काय? बाळासाहेबांनी ( Sanjay Raut Slammed Eknath Shinde ) वाढवलेल्या वृक्षात मोठे झाले, सावली घेतली, फळ खाल्ली. तुम्ही बाजूला झालेले आहात. तर तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि नियुक्त्या करा? राज्यात सतांतर होणारच? राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे. ठीक आहे, कोणाला हे स्वप्न वाटत असेल. पण माझे स्वप्न आहे. प्रत्येकाचे एक स्वप्न असते. मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे. आम्हाला महाराष्ट्र सत्ता आणायची आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे. ती वेळ लवकरच येईल असेही संजय राऊत म्हणाले.
हम दो हमारे दो?- शिंदे - फडणवीस सरकारला एक महिना होत आला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप होत नाही आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीच्या वाऱ्या फेऱ्या सुरू आहेत. अजून मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. यातून वेळ काढत मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरत असतील तर त्यावर टीका करण्याचे कारण नाही. मंत्रिमंडळ का रखडले आहे? हम दो और हमारे दो, सांगू शकतात. संजय राऊत काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे. राजकीय दबावापोटी मला ईडीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. पुन्हा समन्स आल्यावर पाहू. माझा आवाज बंद करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. संजय राऊत काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे. कितीही दबाव आला तरी, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच राहणार गुडघे टेकणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा-Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी
हेही वाचा-Pending Cases In HC : उच्च न्यायालयांमध्ये केंद्र सरकारशी संबंधित तब्बल 80 हजारहून अधिक खटले