ETV Bharat / city

Sanjay Raut to ED Custody : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; वाचा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद - ED arrests Shiv Sena MP Sanjay Raut

शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांना चार दिवस ईडीच्या रहावं लागणार आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सजंय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Sanjay Raut Hearing
सजंय राऊत
author img

By

Published : Aug 1, 2022, 3:52 PM IST

Updated : Aug 1, 2022, 7:25 PM IST

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांना चार दिवस ईडीच्या रहावं लागणार आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला आहे. संजय राऊत यांना 4 वेळा समन्स बजावण्यात आले होते. संजय राऊत यांचे वकील, अशोक मुंदरगी कोर्टात म्हणाले की, संजय राऊत यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे. तो हृदयाशी संबंधित आजाराचे रुग्ण आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

अनिल सिंग पुढे म्हणाले की, ते फक्त एकदाच एजन्सीसमोर हजर झाले. यादरम्यान संजय राऊत यांनी पुरावे, साक्षीदारांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असे ईडीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी सजंय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. दरम्यान, संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना ईडी अधिकाऱ्यांनी जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात हजर केले.

  • Sanjay Raut was summoned 4 times but he appeared before the agency only once. During this, Sanjay Raut tried to tamper with the evidence and key witnesses - ED's lawyer argued

    ED sought 8-day custody of Sanjay Raut

    — ANI (@ANI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रविवारी पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी सेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांनी नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात सांयकाळी नेले. तेथेही तब्बल सहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ही अटक 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री झाली.

रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत घरी चौकशी- पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. रविवारी सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ईडी वतीने संजय राऊत यांना त्यांच्या घरीच नऊ तास सतत विचारपूस केली चौकशी केली. त्यानंतर मुंबईच्या येडी कार्यालयामध्ये संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी नेण्यात आले. या वेळेला शिवसेनेकांनी प्रचंड विरोधदेखील केला. त्याचवेळी संजय राऊत यांच्या घरातील सदस्य कासावीस झालेले दिसून आले.

11 लाख 50 हजार रुपये जप्त- खासदार संजय राऊत यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर आता जी ताजी माहिती येते त्यानुसार खासदार संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? - पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde Announced : राज्यात लवकरच साडेसात हजार पोलीस पदांची भरती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणाहेही

वाचा - Sanjay Raut Action Video : संजय राऊतांचे शक्तिप्रदर्शन; ईडी कार्यालयात पोहचताच गेले टेरेसवर; पाहा व्हिडिओ

Last Updated : Aug 1, 2022, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.