ETV Bharat / city

Andheri By Election: मनसेचे पत्र ही भाजपचीच स्क्रिप्ट होती - संजय राऊत

अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by election) भाजपने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्याविरोधातील आपला उमेदवार मागे घ्यावा, असे पत्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठवले होते. त्यांच्या या पत्रावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Oct 17, 2022, 5:08 PM IST

मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by election) भाजपने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्याविरोधातील आपला उमेदवार मागे घ्यावा, असे पत्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठवले होते. त्यानंतर भाजपने आज पोटनिवडणुकीच्या रिंगणातून आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यांच्या या पत्रावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहिणे हा स्क्रिप्टचाच एक भाग होता. भाजपला निवडणुकीत पराभव दिसत असल्यानेच त्यांनी माघार घेतली.

काय म्हणाले राऊत? : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले होते. यावेळी कोर्ट परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर राज ठाकरे यांनी भाजपला लिहिलेले पत्र हे स्क्रिप्टचाच भाग आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपनं वैयक्तिक सर्वे केला होता. पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची चाहूल लागली होती. उद्धव ठाकरे ही निवडणूक 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होते, त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला. राऊत यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले होते. दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने या मतदारसंघात निवडणूक जाहीर करण्यात आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपच्या वतीने आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.