ETV Bharat / city

ED Raid On Anil Parab : आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, संजय राऊतांची प्रतिक्रिया - undefined

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब ( ED Raid On Anil Parab ) यांच्या सात ठिकाणांच्या मालमत्तेवर छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे ED कडून सांगण्यात येत आहे.

ED Raid On Anil Parab
ED Raid On Anil Parab
author img

By

Published : May 26, 2022, 4:16 PM IST

Updated : May 26, 2022, 5:51 PM IST

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब ( ED Raid On Anil Parab ) यांच्या सात ठिकाणांच्या मालमत्तेवर छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे ED कडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी 'आम्ही अनिल परब यांच्या मागे खंबीर उभे आहोत. भाजपाचीदेखील असंख्य प्रकरणे आमच्याकडे आहेत.' असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया

काय म्हणाले राऊत? - यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, 'आम्ही अनिल परब यांच्या समर्थनात आहोत. भाजपचे केंद्र सरकार विरोधकांच्या विरोधात एजन्सी वापरत आहे. हे केवळ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली कृती आहे. अनिल परब यांच्या पाठीशी त्यांचा पक्ष आणि सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. शिवसेनेला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आले आहे. ज्या प्रकारचे आरोप त्यांच्या मित्रपक्षांवर होत आहेत, त्याहून गंभीर आरोप भाजपच्या नेत्यांवर आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असं राऊत यांनी म्हटले आहे.

जितू नवलानी कुणी पळवलं? - पुढं बोलताना राऊत म्हणाले की, 'भाजपच्या नेत्यांनी विरोध आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, ते गुन्हे याहून गंभीर स्वरूपाची आहेत, जितू नवलानी कोणी पळवलं? याचे उत्तर देखील सबळ पुरावे आहेत, म्हणणाऱ्यांनी द्यायला हवं. भाजपच्या नेत्यांच्या फाईल केंद्रीय तपास यंत्रणांना मी सातत्याने देतो आहे. पण, त्याचं उत्तर देखील येत नाही. त्या फाईल त्यांच्या ऑफिसात जाऊन तशाच पडून आहेत. उघडून देखील बघत नाहीत.

मी मागे हटणार नाही - 'विक्रांत घोटाळा हा या देशातील सगळ्यात घोटाळा म्हणून मी मानतो. या प्रकरणात सोमैयाला दिलासा मिळतो. यांचा टॉयलेट घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला म्हणून काय मी मागे हटणार नाही. आम्ही आणखी काही प्रकरणांना आता हात घालत आहोत. ती सुद्धा लवकरच समोर येतील." असा थेट इशाराच खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. दरम्यान, ईडीने रत्नागिरी, मुंबई आणि पुण्यात सात ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत नव्याने गुन्हा दाखल केल्यानंतर दापोली, मुंबई आणि पुणे येथील ठिकाणांवर शोध घेण्यात येत आहे. ५७ वर्षीय परब हे महाराष्ट्र विधान परिषदेत तीन वेळा शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध - अनिल परबांविरोधात झालेल्या कारवाईविरोधात महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून अशा कारवाया महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केल्या जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जातो. मंत्री अनिल परब यांच्यावर 'ईडी'कडून केली गेलेली कारवाई चुकीची आहे. लोकशाहीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा अशाप्रकारे चुकीचा वापर सगळ्यांसाठी घातक आहे. मात्र, ही कायदेशीर लढाई आम्ही लढत राहू, असा इशारा राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपला दिला आहे. मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हा आरोप केला आहे. तर अनिल परब यांच्यावर झालेली कारवाई हे सूड भावनेने झाली असून या कठीण समयी मध्ये संपूर्ण पक्ष अनिल परब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासूनच त्यांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरव वापर केला जाऊन कारवाई सुरू आहे. केंद्रीय तपास इंटरनेट चा वापर करून महा विकास आघाडी सरकार तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र हा विकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Chandrakant Patil : आपले वक्तव्य सहज होते, सुप्रिया सुळेंचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

Last Updated : May 26, 2022, 5:51 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.